वनस्पतींचे वर्गीकरण (Classification of Plants)

एचर या शास्ञज्ञाने १८८३ साली वनस्पतींचे वर्गीकरण (Classification of Plants) केले. हे वर्गीकरण करताना बीजपञी (Phanerogamae) व अबीजपञी (Cryptogamae) असे दोन मुख्य प्रकार केले.


१) बीजपञी (Phanerogamae)

 • बीया येणार्या वनस्पतींचा समावेश.
 • यांचे आवृत्तीबीजअनावृत्तीबीज या दोन गटात वर्गीकरण करता येते.

आवृत्तीबीज (Angiosperms)

 • बिया फळांमध्ये बंदिस्त असतात.
 • फुल हे प्रजननाचे अवयव असते.
 • या वनस्पती बहुवार्षिक नसतात.
 • उदा.  मका, मोहरी, घेवडा, हरभरा, आंबा, बाॅल्फिया (सर्वात लहान आवृत्तबीजी वनस्पती) , युकाॅलिप्टस (सर्वात उंच आवृत्तबीजी वनस्पती)
एकबीजपञी द्विबीजपञी
एक दलाचे बीज असते दोन दलाचे बीज असते
पोकळ व आभासी खोड भक्कम खोड
फूल ञिभागी असते फूल पंचभागी असते
ज्वारी, मका, गहू, तांदूळ, लसूण

कांदा, केळी, बांबू

आंबा, मोहरी, पिंपळ, सूर्यफूल

शेंगदाणा

५०,००० जाती २,००,००० जाती

 अनावृत्तीबीज (Gymnosperms) 

 • बिया फळांमध्ये बंदिस्त नसतात म्हणजेच या प्रकारच्या वनस्पतींना फळे येत नाहीत.
 • या वनसपती बहुवार्षिक असतात.
 •  Gymnosperms हा शब्द प्रथम थ्रिआेफ्रस्ट्स यांनी त्यांच्या ‘Enquiry into Plants’ पुस्तकात वापरला.
 • अनावृत्तबीज वनस्पतींच्या एकूण ७० प्रजाती व ७२५ जाती आहेत त्यापैकी भारतामध्ये १६ प्रजाती व ५३ जाती आढळतात.

काही अनावृत्तबीज वनस्पतींची वैशिष्ट्ये-

 • सायकस वनस्पती सायनोबॅक्टेरीया सोबत आणि पायनस वनस्पती कवकांसोबत सहजीवन पद्धतीने राहतात.
 • झिंकगोबायलोबा यांना जीवंत जिवाश्म म्हणून अोळखतात.
 • सिक्वीया सेंपीर्व्हीर्नस (३६६ फूट) ही जगातील सर्वात उंच वनस्पती आहे. यालाच ‘Cost Redwood of California’ आणि ‘Father Of Forest’ असेही म्हणतात.
 • टॅक्झोडियम म्युक्रोनॅटम या वनस्पतीचा घेर १२५ फूट आहे.
 • सॅमीया पिग्मी ही सर्वात लहान अनावृत्तबीज वनस्पती आहे.
 • इफेंड्रा या वनस्पतीमध्ये दुहेरी फलन होत असल्यामुळे हा या प्रकारात एकमेव अपवाद आहे.

2) अबीजपञी (Cryptogamae)

 • अपुष्प वनस्पती असून बिया येत नाहीत
 • आर. एच. व्हीटकर या शास्ञज्ञाने अबीजपञी या गटाचे थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा या तीन भागात विभाजन केले.

थॅलोफायटा (Thalophyta)

 • शैवाळांचा विभाग म्हणून आेळख.
 • शैवाळांची पेशीभित्तीका बाहेरून पेक्टीन तर आतून सेल्युलोज या दोन आवरणांनी बनलेली असते.
 • सर्व प्रकारच्या शैवाळांमध्ये  क्लोरोफिल-‘अ’ , कॅरोटिन व झांथोफील ही रंगद्रव्ये असतात.
 • जगातील ९० टक्के प्रकाशसंश्लेषण शैवाळ करतात.
 • शैवाळ हे नाव ‘लिनियस’ या शास्ञज्ञाने दिले आहे.
 • शैवाळाच्या अभ्यासाला ‘फायकोलाॅजी’ असे म्हणतात.
 • ‘माॅरीस’ या शास्ञज्ञाला शैवाळाचा जनक असे म्हणतात आणि ‘लाईंगर’ यांना भारतीय फायकोलाॅजीचा जनक असे मानले जाते.

शैवाळांचे प्रकार

                 

 

हिरवे शेवाळ तपकिरी शेवाळ लाल शेवाळ
गोड्या पाण्यात आढळतात खार्या पाण्यात खार्या पाण्यात
पृथ्वीवरील वनस्पतींचे पूर्वज

अशी अोळख

मॅनीटाॅल आणि लॅमीनटीन या

स्वरूपात अन्न साठवले जाते

फ्लोरीडीन स्टार्च स्वरूपात

अन्न साठवले जाते

पेशीभित्तीकेत सेल्युलोज सोबत

अल्गीन असते

पेशीभित्तीकेत सेल्युलोज सोबत

पेक्टीन असते.

अॅसीटाबुलारीया, उल्वा, कौलेर्पा इक्टोकार्पस, सरगॅगस, फ्यूकस,

लॅमीनारीया, डिक्टाॅइटा

कोंड्रस, जेलीडियम, पाॅलिसायफोनिया,

पाॅरफायरा, ग्रॅसीलारीया, बट्राकोस्पर्मम

 


ब्रायोफायटा (Bryophyta)

 • भूचर वनस्पती असूनही यांना फलन होण्यासाठी बाह्यपाण्याची गरज भासते म्हणून यांना उभयचर वनस्पती असेही आेळखले जाते.
 • शाकीय प्रजनन होते.
 •  सुमारे ९६० प्रजाती व २४,००० जाती अस्तित्वात आहेत.
 • ब्रायोफाइटच्या अभ्यासाला ब्रायोलाॅजी असे म्हणतात.
 • हेडविक यांना ब्रायोलाॅजीचा जनक म्हणून आेळखले जाते.

टेरिडोफायटा (Pteriophyta)

 • अबीजपञीतील सर्वात प्रगत व पृथ्वीवरील पहिली संवहनी संस्था
 • बिजाणूद्वारे अलैंगिक प्रजनन व युग्मकाद्वारे लैंगिक प्रजनन होते.
 • सर्वात लहान टेरिडोफायटा अझोला तर सर्वात उंच टेरिडोफायटा अल्सोफिला हा आहे.
 • थ्रिआेफ्रस्ट्सला वनस्पतीशास्ञ, टेरिडोफाइट्स व पर्यावरण यांचा जनक मानतात.

 

 

 

 


 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: