ल. ना. बोंगीरवार समिती
ल. ना. बोंगीरवार समिती
घोषणा – २६ फेब्रुवारी १९७०
स्थापना – २ एप्रिल १९७०
अहवाल सादर – १५ सप्टेंबर १९७१
एकूण सदस्य – ११
एकूण शिफारशी- २०२
महत्त्वाच्या शिफारशी
- ग्रामपंचायतीचा कर्यकाल ५ वर्षाचा करण्यत यावा.
- न्यायपंचायती रद्द करण्यात याव्यात.
- ग्रामसभेच्या वर्षातून किमान दोन बैठका घेण्यात याव्यात.
- सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडे न ठेवता राज्यशासनाकडे सोपवावा.
- सरपंच समितीची स्थापना करण्यात यावी.
- किमान ५०० लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.
- ग्रामसेवक हा पदवीधर असावा.
- कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने कृषी उद्योग निगमची स्थापना करावी.
- सरपंचांना मानधन देण्यात यावे.
- लोकप्रतिनिधींच्या सहभागासाठी नियोजन व मूल्यमापन समितीची स्थापना करण्यात यावी.
- जिल्हाधिकाऱ्याऐेवजी मूख्य कार्यकारी अधिकाऱ्यास जिल्हा नियोजन समितीचा प्रमुख समजण्यात यावा.