लोकमान्य टिळक

सन १९०५ ते १९२० हा कालखंड टिळकयुग म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्य चळवळीत जहालमतवादी तत्त्वाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केले. त्यामुळे त्यांना व्हेलेटाईन चिरोल यांनी भारतीय असंतोषाचे जनक म्हणून संबोधले आहे.

टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे २३ जुलै १८५६ रोजी झाला. सन १८७२ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा तसेच सन १८७७ मध्ये बी. ए. व १८७९ मध्ये एल.एल.बी.ची परीक्षा उत्तीण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षण संस्था व वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली.

टिळकांचे शैक्षणिक कार्य :

  • लो. टिळकांनी शैक्षणिक कार्याची सुरुवात १ जानेवारी १८८० रोजी पुणे येथे आगरकर, चिपळूणकरांच्या मदतीने ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना करुन केली.
  • त्यानंतर आगरकरांच्या सहकार्याने सन १८८४ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
  • या संस्थेच्या माध्यमातून २ जानेवारी १८८५ रोजी ‘फर्ग्युसन कॉलेज’ सुरू केले. टिळक स्वत: या ठिकाणी गणित व संस्कृतचे अध्यापन करीत होते. 

टिळकांचे वृत्तपत्र क्षेत्रातील कार्य :

  • सन १८८० मध्ये ‘केसरी’ हे मराठी भाषेतील साप्ताहिक व ‘मराठा’ हे इंग्रजी भाषेतील साप्ताहिक सुरू केले.
  • या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय विचार प्रणालीचा प्रसार करण्याचे कार्य केले. 

गणेश उत्सव व शिव जयंतीची सुरुवात :

  • सन १८९४ मध्ये टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. धर्म व संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी व एकतेची भावना निर्माण करुन ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनमत तयार करणे व हा त्यामागील हेतू होता.
  • सन १८९५ मध्ये टिळकांनी रायगड येथील शिव समाधीच्या जीर्णोद्धाराची चळवळ सुरू केली.
  • शिवाजी महाराज हे शौर्य, धैर्य व राष्ट्रप्रेाचे प्रतीक आहेत. त्यांनी अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढा दिला. या महान पुरुषांचे स्मरण व राष्ट्रीयत्त्वाची भावना वाढीस लागावी या उद्देशाने शिवजयंती सुरू केली.
  • पुणे सार्वजनिक सभा : पुणे सार्वजनिक सभा अनेक वर्षे मवाळवाद्यांच्या हातात होती. टिळकांनी १८९५ मध्ये या सभेची सूत्रे हातात घेतली. या सभेच्या माध्यमातून या काळात पडलेल्या दुष्काळ पीडितांना मदत केली. ’