लॉर्ड मार्क्वेस्ट हेस्टींग

लॉर्ड मार्क्वेस्ट हेस्टींग:-१८१३ ते १८२३

  1. याच्या काळात 1816 मध्ये इंग्रज व नेपाळ यांच्यात युद्ध झाले यामध्ये नेपाळचा पराभव झाला.  (नेपाळ आंग्ल युद्ध १८१४ ते १८१६ या काळात झाले.) हे युद्ध १८१६ ला सगौली कराराने समाप्त झाले.
  2. यांच्या काळात रयत थॉमस मुन्रोने मद्रास प्रांतात रयतवारी पद्धत लागू केली. ज्या पद्धतीत शेतकरी हा भूमी स्वामी होता तो सरळ सरकारला कर द्यायचा.
  3.  लॉर्ड हेस्टींगने वृत्तपत्रांना प्रथमत: स्वतंत्रता प्रदान केली. पण पुढे अटी लादल्या. त्याने वृत्तपत्रांवरील प्रसिद्धीपूर्वक नियंत्रण काढून घेतले.
  4. मराठे व इंग्रज यांच्यामध्ये तिसरे युद्ध झाले. या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव होवून 1818 मध्ये संपुर्ण मराठे राजवटीचा पराभव झाला.
  5. लॉर्ड मार्क्वेस्ट हेस्टींग याने कुळांना सरंक्षण देणारा बंगाल कुळ कायदा हा 1822 मध्ये पास केला.
  6. तसेच पेंढाऱ्यांचा त्याने बंदोबस्त केला.