लॉर्ड डलहौसी

लॉर्ड डलहौसी :- 1848 ते 1856

By Sir William Lee-Warner (The Life of the Marquess of Dalhousie, K.T.) [Public domain], via Wikimedia Commons
 1. राज्य कारभारातील अकार्यक्षमता व दत्तक वारस नामंजुर या तत्वानुसार भारतातील अनेक संस्थाने डलहोैसीने खालसा केली व ती इंग्रजी साम्राज्यास जोडली. 
 2. भारतामध्ये इंग्रजी साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार डलहौसीच्या काळात झाला. ज्या खालोखाल लाॅर्ड वेलस्लीने सर्वाधिक विस्तार केला.
 3. इंग्रज व शिख यांच्यामध्ये मार्च 1849 मध्ये दुसरे युद्ध होऊन शिखांचा पराभव झाला. पंजाब हा प्रांत 1849 मध्ये इंग्रजी साम्राज्यास जोडण्यात आला.
 4. 1852 मध्ये दक्षिण ब्रम्हदेश भारतास जोडण्यात आला.
 5. दत्तक वारस नामंजुर या तत्वानुसार सातारा, संबळपुर, नागपूर, जैतापूर, झांशी, उदयपुर, तंजावर, कर्नाटक, अयोध्या इ. संस्थाने खालसा करण्यात आली. 
 6. लॉर्ड  डलहोैसी यास भौतिक सुधारणांचा जनक म्हणून ओळखले जाते.
 7. 16 एप्रील 1853 रोजी देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या दरम्यान 34 किमी एवढी धावली. यामध्ये पहिले भारतीय प्रवासी म्हणून नाना जगन्नाथ शंकरसेठ व दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते.
 8. या काळातच तारायंत्र, पोस्ट, रेल्वे इ. भौतिक सुधारणा सुरु झाल्या.
 9. 1854 मध्ये भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे कावसजी नानाभॉय यांनी सुरु केली.
 10. 1855 मध्ये देशातील पहिली ताग गिरणी कलकत्त्याजवळील रिसरा येथे सुरु करण्यात आली.
 11. 1856 मध्ये लाॅर्ड डलहौसीने विधवा पुर्नविवाहाचा कायदा (विडो रिमॅरेज अ‍ॅक्ट, १८५६) संमत केला. त्यासाठी त्याला ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मदत केली.
 12. अशा प्रकारे डलहौसीने भारतामध्ये भौतिक सुधारणेची सुरुवात केली परंतु दत्तक वारस नामंजुर या तत्वानुसार त्याने अनेक राज्ये खालसा केल्याने भारतीय जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. याचेच पर्यावसान 1857 च्या उठावामध्ये झाले.
 13. लॉर्ड डलहौसीच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याचा विस्तार पश्चिम भागात झाला.
 14. लॉर्ड डलहौसीने सन्यात तीन रेजिमेंटची भर घातली.
 15. भारतात पोस्ट स्टॅम्पचा वापर लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाला.
 16. लॉर्ड डलहौसीला भारतात विद्युत तारेचा प्रारंभकर्ता असे म्हणतात.
 17. लॉर्ड डलहौसीने व्यापारासाठी सर्व बंदरे खुली करून कर रद्द केला.
 18. १८५४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली.
 19. १८५४ चा वुडचा खलिता – त्यानुसार प्राथमिक शिक्षणापासून ते विश्वविद्यालयीन शिक्षणापर्यंत एक शिक्षा योजना बनविण्यात आली. यालाच भारतीय शिक्षणाचा मॅग्रा कार्टा असे म्हणतात. यानुसार प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण असावे, अशी शिफारस करण्यात आली.