पहिले इंग्रज भुतान युद्ध याच व्हाईसरॉय च्या काळामध्ये लढले गेले.
1866 मध्ये ओरीसा प्रांतामध्ये तर 1869 मध्ये बुंदेलखंड प्रांतामध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. हा दुष्काळ निवारण्यासाठी जनरल कँम्पबेल यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमण्यात आला. आयोगाच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्याचा प्रमुख रिचर्ड स्ट्रची यास नियुक्त केले.
शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी पंजाब आणि अवध कुळ कायदा 1868 मध्ये त्याने संमत केला.