लॉर्ड चेम्सफर्ड

लॉर्ड चेम्सफर्ड :- (1916 ते 1921)

  1. 1919 मध्ये मॉटेग्यु-चेम्सफर्ड ॲक्ट पास झाला. या कायद्यानुसार द्विदल शासन पद्धती सुरु करण्यात आली.
  2. तसेच शिखांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले. 
  3. 20 आॅगस्ट 1917 रोजी भारतमंत्री लाॅर्ड माँटेग्यु यांनी भारताला जबाबदार राज्य पद्धती देण्यात येईल अशी घेाषणा केली.
  4. लॉर्ड चेम्सफर्डच्या काळात तिसरे अफगाणिस्तान युद्ध झाले. 
  5. विद्यापीठातुन केल्या जाणाऱ्या अध्यापनाचा शोध घेण्यासाठी व त्यामध्ये आवश्यक ते बदल सुचविण्यासाठी 1917 मध्ये सॅडलर कमिशन नेमण्यात आले. 
  6. माँटेग्यु चेम्सफर्ड कायद्याच्या विरोधात मुंबई येथे भरलेल्या खास अधिवेशनाचे अध्यक्ष हसन इमाम हे होते. 
  7. 13 एप्रिल 1919 मध्ये पंजाब मधील अमृतसर येथे जालीयनवाला बाग हत्याकांड घडले. याच्या चौकशीकरिता ब्रिटीश शासनाने हंटर कमिशन नेमले. 28 मे 1920 रोजी या कमिशनने आपला अहवाल प्रसिद्ध केला.