लिंगाधारित विकास निर्देशांक

लिंगाधारित विकास निर्देशांक

यु. एन. डी. पी. २०१४ पासून लिंगाधारित विकास निर्देशांक जाहीर करत आहे.हा निर्देशांक आरोग्य, शिक्षण व जीवनमानाचा दर्जा या मुलभूत निकषांतील स्ञी-पुरूषांतील असमानता विचारात घेवून जेंडर गॅप निश्चित करतो. मानव विकास निर्देशांकाचीच पद्धत वापरून पुरूष व स्ञियांचा स्वतंञ HDI काढला जातो. पुरूष व स्ञियांच्या HDI चे एकमेकांशी असलेले प्रमाण म्हणजेच लिंगाधारित विकास निर्देशांक होय. हा निर्देशांक पुरूष व स्ञिया यांच्या विकासात किती अंतर अाहे हे दर्शवतो. हे अंतर भरून काढण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी याचा उपयोग होतो.

निकष

हा निर्देशांक पुढील तीन निकषांच्या आधारे मोजला जातो.

आरोग्य

आरोग्याच्या स्तरातील जेंडर गॅप मोजण्यासाठी  जन्माच्या वेळचे महिला व पुरुषाचे आयुर्मान हे निर्देशक वापरले जाते.

शिक्षण

शैक्षणिक स्तरातील जेंडर गॅप पुढील दोन निर्देशक वापरले जातात.

  1. २५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या महिला व पुरूषांची सरासरी शालेय वर्षे,
  2. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुली व मुलांची अपेक्षित शालेय वर्ष व शिक्षणाचा निर्देशांक या दोन्ही निर्देशांकाचा भुमितीय मध्य असतो.

जीवनमानाचा दर्जा

आर्थिक संसाधनांवरील प्रभावाबाबत जेंडर गॅप मोजण्यासाठी महिला व पुरूषाचे अर्जित उत्पन्नाचा वापर केला जातो. त्यासाठी दरडोई स्थूल राष्टृीय हा निर्देशांक वापरला जातो.

हा निर्देशांक काढण्यासाठी प्रथम महिला व पुरुषांचा स्वतंञ HDI काढला जातो व त्यावरून हा निर्देशांक ठरवतात.