लिंगाधारित असमानता निर्देशांक

प्रस्तावना

लिंगाधारित असमानता निर्देशांक: UNDP च्या २०१० च्या मानव विकास अहवालापासून १९९५ पासून जाहीर होणार्या लिंगाधारित विकास निर्देशांक व लिंग आधारित सबलीकरण परिमान यांची जागा लिंगाधारित असमानता निर्देशांकाने घेतली.

लिंगाधारित असमानता निर्देशांक: निकष

हा निर्देशांक ३ निकष व ५ निर्देशकांच्या आधारे काढला जातो.

जनन आरोग्य

हा निकष मोजण्यासाठी पुढील निर्देशक वापरले जातात.

माता मृत्यू दर

यासाठीची माहिती युनिसेफच्या “जगातील बालकांची स्थिती” या अहवालातून संकलित केली जाते.

किशोरवयीन जनन दर

यासाठीची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक कार्य खात्याकडून मिळवळी जाते.

सबलीकरण

सबलीकरणाचे प्रमाण मोजण्यासाठी पुढील २ निर्देशक वापरले जातात.

संसदीय प्रतिनिधीत्व

याची माहिती आंतरराष्ट्रीय संसदीय संघाकडून मिळवली जाते.

उच्च शिक्षणाचा स्तर

याची माहिती युनेस्कोकडून मिळवली जाते.

श्रमबाजारातील सहभाग

याची माहिती जागतिक कामगार संघटनेकडून मिळवली जाते.

 

मूल्य

हा निर्देशांक ० ते १ दरम्यान असते. ० म्हणजे समाजात पूर्ण लिंग समानता आहे तर १ म्हणजे समाजात पूर्ण लिंग असमानता आहे.