लाॅर्ड वेव्हेल

लाॅर्ड वेव्हेल :- (1943 ते 1947)

  1. 14 जुन 1945 रोजी शिमला येथे सर्व पक्षीय बैठक बोलविण्यात आली त्यानुसार 25 जुन 1945 रोजी वेव्हेल योजना जाहीर करण्यात आली. काॅंग्रेस व मुस्लिम लीगने ही योजना स्विकारली नाही. वेव्हेल योजनेच्या सर्व पक्षीय संमेलनात हिंदु महासभेस बोलविण्यात आले नव्हते. 
  2. तत्पुर्वी चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी 08 एप्रील 1944 रोजी भारत व पाकिस्तान विभाजन संबंधाने राजाजी योजना मांडली. 
  3. 20 फेब्रुवारी 1947 रोजी इग्लंडचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी 06 जुन 1948 पर्यंत भारताने स्वत:ची राज्य घटना तयार करावी नाहीतर इंग्रजी सत्ता पुर्वव्रत राहील अशी धमकी दिली. 
  4. ॲटली च्या घोषणेमध्ये सर्वप्रथम भारतासाठी संपुर्ण स्वातंत्र्याचा उल्लेख करण्यात आला.