लाॅर्ड लिटन

लाॅर्ड लिटन :- (1876 ते 1880)

  1. लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता. म्हणून डिझरायलीने त्याची भारताच्या व्हाइसरॉयपदी १८७६ मध्ये नेमणूक केली.
  2. 01 जानेवारी 1877 रोजी लाॅर्ड लिटनने दिल्ली येथे दरबार भरवून इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिला कैसर-ए-हिंद ही पदवी दिली. 
  3. लिटन याच्या कारकिर्दीत 1877 मध्ये सर सय्यद अहमद खान यांनी अलिगढ येथे मोहमेडन ॲंग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली.  
  4. 1878 साली लाॅर्ड लिटन याने देशी वृत्तपत्राचा कायदा (व्हर्नाकुलर प्रेस ॲक्ट) पास केला. त्यामुळे भारतीय वृत्तपत्रांवर मोठ्या प्रमाणात बंधने लादण्यात आली. 
  5. 1878 साली भारतीय नागरिकांना शस्त्र बाळगण्यास मनाई करणारा भारतीय शस्त्रास्त्र कायदा पारित केला. 
  6. सनदी सेवेसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी वयोमर्यादा 21 वरुन 19 करण्याचे काम लिटन याने केले. यासाठी लिटन याने स्टॅटुटरी सिव्हील सर्व्हीसेस ॲक्ट पास केला.
  7. लॉर्ड लिटन 1878 मध्ये ब्रिटीश मालावरील आयात कर रद्द केला. 
  8. मुंबई, मद्रास, अवध, हैद्राबाद व म्हैसुर या प्रांतातील दुष्काळ संदर्भात लॉर्ड लिटन याने स्ट्रॅची आयोग नेमला. (अहवाल १८८०). तिचा अहवाल स्वीकारून सरकारने १८८३ साली दुष्काळ संहिता जाहीर केली.
  9. लिटनच्या उद्दाम धोरणामुळे दुसरे अफगाण युद्ध उद्भवले.
  10. भारतामध्ये चांदी ऐवजी सुवर्ण परिमान स्विकारण्याची शिफारस सर्वप्रथम लॉर्ड लिटन याने केली. ही शिफारस पुढे लाॅर्ड कर्झन याने अंमलात आली.

Leave a Reply