लाॅर्ड मेयो

लाॅर्ड मेयो :- (1869 ते 1872)

  1. 14 डिसेंबर 1870 रोजी आर्थिक विकेंद्रीकरणाचे बिल पास केल्याने त्यास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणतात. 
  2. 1872 मध्ये लाॅर्ड मेयो याने भारताची पहिली जनगणना केली. 
  3. लाॅर्ड मेयो यांने भारतीय राजपुत्रांना शिक्षण देण्यासाठी अजमेर येथे मेयो कॉलेज स्थापन केले. 
  4. आंतर-जातीय व आंतर-धर्मीय विवाहास प्रोत्साहन देणारा नेटीव्ह मॅरिज ॲक्ट 1872 हा लाॅर्ड मेयो याने पास केला. 
  5. लाॅर्ड मेयो याने नवे अफगाण धोरण राबविले. 
  6. लाॅर्ड मेयो याने मीठावरील करामध्ये वाढ केली.
  7. अंदमान तुरुंगाचे निरीक्षण करण्यासाठी लाॅर्ड मेयो गेला असताना शेरअली या क्रांतिकारकाने त्याचा खुन केला.