Skip to contentलाॅर्ड नाॅर्थब्रुक :- (1872 ते 1876)
- १८५३ मध्ये लॉर्ड नॉर्थब्रुक हा चार्ल्स वुडचा सचिव होता. लॉर्ड नॉर्थब्रुक हा अनियोजित खाजगी आर्थिक व्यवहार आणि मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कर्ता होता.
- बिहार, बंगाल प्रांतात दुष्काळ निवारणार्थ (१८७३-७४) ब्रम्हदेशातून तांदूळ आयात केला. बंगाल-बिहार दुष्काळ निवारणार्थ नॉर्थब्रुकने ६६ लक्ष पौंड खर्च केले.
- त्याच्या काळात पंजाबातील कुका चळवळीचा सामना करावा लागला.
- त्याच्याच कारकिर्दीत मुंबईत १८७५ साली आर्य समाज व थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली.
- सर जॉन लॉरेंन्स यांनी अवलिंबलेले प्रभावी निष्क्रीयतेचे धोरा लॉर्ड नार्थब्रुक यांनी चालविले.
- नॉर्थब्रुकची कारकीर्द अफगाण संदर्भात विरोधी धोरणामुळे प्रसिद्ध आहे.
- 1874 साली निवडून आलेले इंग्लंडचे पंतप्रधान डिझरायली यांच्या सोबत झालेल्या संघर्षात लाॅर्ड नॉर्थब्रुक यांनी राजीनामा दिला.
You Might Also Like