लाॅर्ड कॅनिंग

लाॅर्ड कॅनिंग :- (1856 ते 1858-गव्हर्नर जनरल आणि 1858 ते 1862-व्हाईसरॉय)

 1. लॉर्ड कॅनिंग हा ब्रिटीश हिंदुस्थानचा पहिला व्हाईसरॉय होता.
 2. राणीचा जाहीरनामा (पंतप्रधान डर्बीनी तयार केला.) लॉर्ड कॅिनगने १ नोव्हेंबर, १८५८ रोजी अलाहाबादच्या दरबारात वाचून दाखविला.
 3. लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली कायदा समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार 1860 मध्ये भारतीय दंड संहिता IPC मंजुर करण्यात आली. लॉर्ड मेकॉले याने भारतीय दंड संहितेचा कच्चा मसुदा तयार केला होता. १८६२पासून संहितेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली.
 4. कॅनिंग यांनी १८६१ साली पोलीस खात्यात सुधारणा केल्या. पोलीस विभागपदी इन्स्पेक्टर जनरल (आयजी) जिल्हा पोलीस प्रमुखपदी पोलीस अधीक्षक (एसपी) तालुका प्रमुखपदी डेप्युटी इन्स्पेक्टर इ.च्या नेमणुका केल्या. 1861 साली पोलीस खात्याची निर्मिती करुन इंस्पेक्टर जनरल हे पोलीस खात्यातील सर्वोच्च पद निर्माण केले. 
 5. 1860 मध्ये भारतात आय सी एस परीक्षेची सुरुवात करण्यात आली. आय सी एस परीक्षा पास होणारा पहिले भारतीय :- सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आय सी एस अधिकारी होणारे पहिले भारतीय :- सत्यंद्रनाथ टागोर. 
 6. 1861 मध्ये लाॅर्ड कॅनिंग यांनी हायकोर्ट ॲक्ट पास केला. मद्रास, मुंबई व कलकत्ता या ठिकाणी उच्च न्यायालये अस्तित्वात आली. 
 7. १८५९ मध्ये भारतमंत्री म्हणून चार्ल्स वुड आला. वुडच्या साहाय्याने कॅिनगने प्रत्येक प्रांतात शिक्षण खात्याची स्थापना केली.
 8. इ.स. १८५७ मध्ये मुंबई, मद्रास, कलकत्ता (कलकत्ता- २४ जानेवारी) विद्यापीठांची स्थापना करण्यात आली.
 9. १८६१ च्या दुष्काळ चौकशीसाठी कर्नल स्मिथच्या अध्यक्षतेखाली हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिला चौकशी आयोग कॅनिंगने नेमला.
 10. 1861 च्या कॉन्सिल ॲक्ट नुसार हिंदी वकील नेमण्यात सुरवात झाली. 
 11. 1860 मध्ये दिल्ली, आग्रा या प्रांतामध्ये दुष्काळ निवारणासाठी कर्नल स्मिथ आयोग नेमण्यात आला. 
 12. भारतामध्ये इन्कम टॅक्सची सुरुवात लाॅर्ड कॅनिंग याने केली. 
 13. 1858 मध्ये स्वत:च्या उद्योगांची भरभराट व्हावी म्हणून ब्रिटीशांनी भारताच्या वस्त्रोद्योगावर अंतर्गत कर लावले.