लाॅर्ड काॅर्नवाॅलिस

लाॅर्ड काॅर्नवाॅलिस:- 1786 ते 1793

  1. काॅर्नवाॅलिसने भारतीय प्रशासन सेवेत महत्वपुर्ण बदल घडवुन आणले. कॉर्नवॉलिसने कलेक्टरांच्या हातात सत्ता केंद्रित केली. 1786 ला कलेक्टरांना दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्त केले.
  2. 1790 मध्ये फौजदारी कायद्यात सुधारणा करण्यात आली. भारतीय न्यायाधीशांच्या हातातील जिल्हा फौजदारी न्यायालय समाप्त करण्यात आले. त्याजागी 5 फिरती न्यायालये सुरू करण्यात आली.
  3. प्रांतिक न्यायालयाची स्थापना कलकत्ता, मुíशदाबाद, ढाका, पटणा या ठिकाणी झाली.
  4. न्यायाधीशांचे पगार वाढविले. तसेच त्याने कॉर्नवॉलिस कोड नावाची संहिता तयार केली.
  5. कॉर्नवॉलिस संहिता – अधिकार विभाजनाच्या तत्त्वावर कॉर्नवॉलिसची संहिता आधारित आहे. त्याने कर व न्यायपद्धती विभाजित केली. त्याने कलेक्टरकडेच पूर्वीचे न्यायालयीन व फौजदारी अधिकार होते ते काढून त्याकडे फक्त कर अधिकार शिल्लक ठेवले. जिल्हा सत्र न्यायालयात स्वतंत्र न्यायाधीश नेमणूक केली. भारतात त्याने कायद्यांच्या सर्वोच्चतेचा नियम लागू केला. कॉर्नवॉलिसची न्यायप्रणाली ही पाश्चिमात्य न्याय संकल्पना व समतेच्या तत्त्वांवर आधारित होती.
  6. पोलीस सुधारणा- त्याने पोलिसांना जास्त वेतन द्यावयाचे ठरवले. खुनी व्यक्ती व चोरांना पकडल्यास खास पुरस्कार जाहीर केला. जमीनदारांकडून पोलीस अधिकार काढून घेण्यात आले.
  7. कर सुधारणा – १७८७ मध्ये कॉर्नवॉलिसने प्रांतांना राजस्व भागात विभाजित केले. त्यावर कलेक्टरची नियुक्ती केली.
  8. 1793 मध्ये काॅर्नवाॅलिसने बंगाल व बिहार प्रांतामध्ये शेतसारा वसुलीसाठी कायमधारा पद्धत सुरु केली. 
  9. 1805 मध्ये लॉर्ड काॅर्नवाॅलिस बंगालचा नवीन गव्हर्नर जनरल म्हणून पुन्हा आपल्या अधिकार पदावर आला. परंतु कॉलराच्या साथीने गाझीयाबाद येथे त्याचा मृत्यु झाला.