लाॅर्ड कर्झन

लाॅर्ड कर्झन :- (189९ ते 1905)

lord curzon
Source- Library of Congress [Public domain]
 1. 20 व्या शतकातील पहिला व्हाईसरॉय. 
 2. 1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले. 
 3. 1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला. 
 4. 1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने इंपिरिअल कॅडेट कोर ची स्थापना केली. 
 5. 23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.
 6. 1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन नेमण्यात आले. 
 7. 1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच क्रिमीनल इंन्वेस्टिगेशन खात्याची सुरुवात झाली. 
 8. 1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले. 
 9. 1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली. 
 10. 1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला. 
 11. 1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला. 
 12. लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले. 
 13. 1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली. 
 14. लाॅर्ड कर्झनच्या काळात डिएसपी व डिवायएसपी यांची थेट नेमणूक सुरु झाली. 
 15. ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे लाॅर्ड कर्झन हा 1905 मध्ये मायदेशी परतला. 
 16. कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्ट सन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. 
 17. लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.  
 18. 19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकंनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते. 
 19. लोकमान्य टिळक आणि प्रसिद्ध इतिहासकार ईश्वरी प्रसाद यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.