राष्ट्रीय सामाजिक सहयोग योजना

राष्ट्रीय सामाजिक सहयोग योजना

 • भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ४१ अन्वये राज्य त्याच्या नागरिकांना बेकारी, वृद्धत्व, अपंगत्व, आजारपण या काळात स्वतःच्या आर्थिक क्षमतेनुसार सार्वजनिक मदत देईल अशी तरतूद केलेली आहे.
 • या तत्वाला अनुसरून भारत सरकारने १५ ऑगस्ट १९९५ रोजी राष्ट्रीय सामाजिक सहयोग योजना लागू केली.
 • ही योजना पुर्णपणे केंद्रीय योजना आहे.
 • १९९५ मध्ये जेंव्हा ही योजना  सुरू झाली तेंव्हा या योजनेत पुढील घटकांचा समावेश होता-   १) राष्ट्रीय वृद्धत्व पेंशन योजना- यात ६५ वर्षावरील निराधारांना ७५ रुपये इतकी पेंशन दिली जाई.  २) राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ३) राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना

घटनाक्रम

 • २०००-राष्ट्रीय वृद्धत्व पेंशन योजनेस पाञ नसणाऱ्या
 • २००१-राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना हा घटक कुटुंब कल्याण मंञालयाकडे हस्तांतरित करण्यात आला.
 • २००६-राष्ट्रीय वृद्धत्व पेंशन योजनेतील पेंशनची रक्कम ७५ रु. वरून २०० रु केली.
 • २००७-राष्ट्रीय सामाजिक सहयोग योजना दारिद्र्य रेषेखालील सर्व व्यक्तींसाठी खुली केली गेली.राष्ट्रीय वृद्धत्व पेंशन योजनेचे नाव इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धत्व पेंशन योजना असे बदलले.
 • २००९-राष्ट्रीय सामाजिक सहयोग योजनेचा विस्तार झाला. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेंशन योजना(४० ते ६४ वयोगटातील विधवा महिलांसाठी) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग पेंशन योजना(१८ ते ६४ वयोगटातील व दारिद्र्य रेषेखालील अपंग व्यक्तींसाठी) या योजनांचा राष्ट्रीय सामाजिक सहयोग योजनेत समावेश झाला.
 • २०११-  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धत्व पेंशन योजनेत लाभार्थ्यांसाठी वयोमर्यादा ६५ वरून ६० केली व ८० वर्षावरील व्यक्तींसाठी पेंशनची रक्कम २०० रु. वरुन ५०० रु. इतकी केली गेली. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेंशन योजनेसाठी लाभार्थ्यांसाठी वयोमर्यादा ४० ते ५९ अशी बदलली.   इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग पेंशन योजनेत लाभार्थ्यांसाठी वयोमर्यादा १८ ते ५९ अशी बदलली.
 • २०१२- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेंशन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग पेंशन योजना यामध्ये पेंशनची रक्कम २०० रु. वरुन ३०० रु. इतकी केली गेली. आणी वयोमर्यादा अनुकृमे ४० ते ७९ व १८ ते ७९ अशी बदलली.

सद्यस्थिती

सध्या राष्ट्रीय सामाजिक सहयोग योजनेत पुढील योजनांचा समावेश आहे.

१) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धत्व पेंशन योजना-

पाञता- ६० वर्षांवरील दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती.

फायदे- ६० ते ७९ वयोगटातील व्यक्तींना ४०० रुपये तर ८० वर्षांवरील व्यक्तींना ५०० रुपये पेंशन

 

२) इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेंशन योजना-

पाञता- ४० वर्षांवरील विधवा व दारिद्र्य रेषेखालील महिला

फायदे- ३०० रुपये पेंशन(८० वर्षांवरील महिलांना ५०० रुपये पेंशन)

 

३) इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग पेंशन योजना-

पाञता- १८ वर्षांवरील ८० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती.

फायदे- ३०० रुपये पेंशन(८० वर्षांवरील व्यक्तींना ५०० रुपये पेंशन)

 

४) राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यास एकरकमी २०००० रुपयांची मदत दिली जाते. अशी व्यक्ती १८ ते ६० वयोगटातील असावी. कुटुंबातील प्रत्येक कर्त्या व्यक्तीच्या मृत्युच्या बाबतीत ही मदत दिली जाते.

 

५) अन्नपुर्णा योजना-  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धत्व पेंशन योजनेस पाञ असणाऱ्या व्यक्ती माञ ज्यांना त्या योजनेचे लाभ मिळालेले नाहीत अशा व्यक्तींना दरमहा १० किलो तांदूळ मोफत पुरवला जातो.