Contents
show
काँग्रेस स्थापनेची पार्श्वभूमी
काँग्रेस स्थापनेची पार्श्वभूमी
- इ.स. १८३७ मध्ये द्वारकानाथ टागोर यांनी लॅन्ड होल्डर्स असोसिएशन ही संस्था जमीनदार वर्गाचे हितसंबध जोपासण्यासाठी काढली.
- १८५२ मध्ये मद्रासमध्ये मद्रास नेटिव्ह असोसिएशन व मुंबईत बॉम्बे असोसिएशन स्थापन झाली.
- १८६६ मध्ये दादाभाई नौरोजींनी व्योमेशचंद्र बॅनर्जींच्या सहकार्याने लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन संस्था स्थापन केली.
- १८७० मध्ये पुण्यात सार्वजनिक काकांच्या नेतृत्त्वाखाली सार्वजनिक सभा स्थापन होऊन तिने हिंदी लोकांच्या हक्कांच्या मागण्या सुरु केल्या.
- बंगालमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी इंडियन असोसिएशन ही संस्था निर्माण करुन १८८३ व १८८५ मध्ये कलकत्यास राष्ट्रीय परिषदा भरविल्या.
- १८८५ मध्ये मुंबईत न्या. तेलंग, फिरोजशहा मेहता यांनी बॉम्बे प्रेसिडन्सी असोसिएशन ही राजकीय संस्था स्थापन केली.
- या सर्व राजकीय संघटनांच्या कार्यामुळे व जनजागृतीमुळे राष्ट्रीय पातळीवर सनदशीर राजकारण करण्यासाठी आखिल भारतीय स्वरुपाची संघटना स्थापन करण्याचा विचार नवशिक्षीत तरुणांमध्ये निर्माण झाला.
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना
- सन १८८४ मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरीनच्या संमतीनंतर ह्यूम ‘इंडीयन नॅशनल युनियन’ नावाची संस्था स्थापन केली.
- या संस्थेचे पहिले अधिवेशन न्या. रानडेंच्य प्रेरणेने पुण्याला घेतले जावे असे ठरले.
- या अधिवेशनाची जबाबदारी सार्वजनिक सभेच्या वतीने सीतारामपंत चिपळूणकरांनी स्वीकारली.
- त्याप्रमाणे डिसेंबर १८८५ मध्ये पुण्यात पहिले अधिवेशन भरविण्यासाठी परिपत्रक काढण्यात आले परंतु याच काळात पुण्यात कॉलराची साथ सुरु झाल्याने हे अधिवेशन २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई येथे भरविण्यात आले.
२८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या सर गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात इंडीयन नॅशनल काँग्रेस म्हणजेच हिंदी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. या अधिवेशनात संपूर्ण देशातून ७२ प्रतिनिधी आले होते. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून कलकत्याचे व्योमेशचंद्र बॅनर्जी यांची निवड झाली. तर ए. ओ. ह्युम हे सचिव होते.
अधिवेशनातील ठराव
या अधिवेशनात एकूण नऊ ठराव पास करण्यात आले.
- राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक समिती ब्रिटीश सरकारने नेमावी.
- इंडिया कौन्सिलवर अनावयक खर्च होत असल्याने ते बरखास्त करावे.
- केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळात लोकनियुक्त प्रतिनिधींची संख्या वाढवावी.
- पंजाब व वायव्य प्रांतात विधीमंडळे स्थापन करावीत.
- लष्करावरील खर्चात कपात केली जावी.
- भारतीयांनी तांत्रिक व लष्करी शिक्षण दिले जावे.
- शासकीय सेवा स्पर्धा परिक्षेसाठी उमेदवारांची निर्धारीत वयोमर्यादा वाढवावी व परिक्षा इंग्लंडप्रमाणे भारतातही घेतल्या जाव्यात.
- न्यायदान व कार्यकारी शाखेचे अधिकार एकाच व्यक्तीच्या हाती केंद्रीत नसावे.
- भारतीय मालासाठी संरक्षक जकातीचे कुंपण उभारले जावे आणि मिठावरील कर रद्द व्हावा.
पहिल्या अधिवेशनाची वैशिष्ट्ये
पहिल्या अधिवेशनाची वैशिष्ट्ये
- अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरले होते. (गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय)
- एकूण ७२ प्रतिधिी उपस्थित. त्यामध्ये मुंबई १८, पुणे ९ (मुंबई इलाखा), मद्रास ८, कलकत्ता ३, लखनौ ३ इत्यादी प्रतिनिधी हजर होते.
- केसरी, मराठा, नव विभाकर, इंडियन, मिरर, नसीस, हिंदूवाणी, ट्रीब्युन, इंद्रप्रकाश, हिंदू, फ्रिसेंट इत्यादी वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित.
- अधिवेशनाची माहिती सर्वसामान्य जनतेला समजली.
- जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला.
- भारत ब्रिटीश राजकारणावर चर्चा झाली.
- सनदशीर मार्गाने सरकारपुढे मागण्या मांडल्या.
- काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनासाठी कलकत्त्याचे प्रतिनिधी हजर नव्हते.