राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA-रुसा) ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेची सुरुवात 2013 मध्ये करण्यात आली.  या योजनेद्वारे पात्र राज्य उच्च शैक्षणिक संस्थांना निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सेंट्रल फंडिंग सर्वसाधारण श्रेणी राज्यांसाठी 60:40, विशेष श्रेणी राज्यांकरिता 90:10 आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 100% च्या गुणोत्तरामध्ये आहे.

केंद्रीय कॅबिनेटने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA-रुसा) ही केंद्रपुरस्कृत योजना ३१/०३/२०२० पर्यंत चालू ठेवण्यास मंजुरी  दिली. या योजनेद्वारे २०२० पर्यंत देशातील Gross Enrolment Ratio मध्ये  ३०% इतकी वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे.

रुसाचे मुख्य उद्दिष्ट्ये

  • विहित नियम आणि मानके यामध्ये अनुरूपता सुनिश्चित करुन राज्य संस्थांची एकूण गुणवत्ता सुधारणे आणि अनिवार्य गुणवत्ता आश्वासक फ्रेमवर्क म्हणून प्रमाणीकरण(accreditation) चा स्वीकार करणे.
  • राज्य पातळीवर नियोजन व देखरेख करण्यासाठी एक सुलभ संस्थात्मक रचना तयार करुन राज्य विद्यापीठांमध्ये स्वायत्तता वाढविणे आणि संस्थांमध्ये प्रशासकीय सुधारणा करणे.
  • संलग्नता, शैक्षणिक आणि परीक्षा प्रणालींमध्ये सुधारणा सुनिश्चित करणे
  • सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये गुणवत्तेपूर्ण अध्यापनाची पुरेशी उपलब्धता आणि सर्व स्तरावर रोजगाराच्या क्षमता वाढतील याची खात्री करणे
  • संशोधन आणि परिवर्तनास चालना देण्यासाठी उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये सक्षम वातावरण तयार करणे.
  • अस्तित्वात असलेल्या संस्थांमध्ये अतिरिक्त क्षमता निर्माण करुन तसेच नवीन संस्था स्थापन करुन उच्च शिक्षणाचा विस्तार करणे.
  • देशातल्या सेवा-रहित आणि वंचित क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण संस्थांची स्थापना करून उच्च शिक्षण मिळण्याच्या बाबतीत प्रादेशिक असंतुलन सुधारणे.
  • अनुसूचित जाती-जमाती आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गात उच्च शिक्षणाची पुरेपूर संधी उपलब्ध करुन उच्च शिक्षणात सुधारणा करणे; महिलांचे समावेशन, अल्पसंख्यांक आणि वेगळ्या विकलांग व्यक्तींना प्रोत्साहन देणे.