राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे

भारताचे एकीकरण

इंग्रजांनी संपूर्ण भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले असल्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारी, अरुणाचल प्रदेश ते बलुचिस्तान पर्यंतचा प्रदेश त्यांच्या अधिपत्याखाली होता. या मोठ्या विस्तीर्ण देशातील लोक एकमेकांच्या संपर्कात आले व त्यातूनच राष्ट्रीयत्त्वाच्या भावनेचा उदय झाला. भारत हा एक देश आहे ही ऐक्य भावना भारतीयांत निर्माण झाली.

दळणवळण 

इंग्रजी सैन्यांसाठी व मालवाहतूकीसाठी अनेक सोयी केल्या. यामध्ये रेल्वे, रस्ते, पोस्ट, तार या सोयी प्रामुख्याने केल्या. यामुळे व्यक्ती व्यक्तीमधील अंतर कमी झाले. संपर्क साधने सोईचे झाले. यामुळे भारतीय जनता आपआपसात सांजस्याने एकीने राहू लागली. प्रांतभेद, जातभेद विसरून जनता एक झाली. यातून राष्ट्रवादाचा उदय झाला. दळणवळणाची साधने ही राष्ट्रवादवाढीस कारणीभूत ठरली.

आर्थिक एकीकरण 

इंग्रजांनी भारतात एक चलन व्यवस्था राबविली. यात मालाची आवक-जावक सोपी झाली. अनेक प्रकारे वित्तीय समृद्धता आली. यामुळे आर्थिक एकीकरणास सुरुवात झाली. या एकीकरणास बँका, विमा कंपन्यांनी हातभार लावला. अनेक मार्गांनी वर्षानुवर्षे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी चालविलेले अर्थ शोषणामुळे आर्थिक विनाश झाला. तो टाळण्यासाठी राजकीय हक्क मिळविणे आवश्यक होते. त्यातून राष्ट्रीय भावना वाढली.

इंग्रजी शिक्षण

मेकॉलेच्या ध्येय धोरणामुळे भारतामध्ये इंग्रजी शिक्षणास प्रारंभ झाला. या इंग्रजी शिक्षणामुळे, भाषेमुळे भारतांच्या काना कोपऱ्यातील लोकांपर्यंत आपले विचार सर्वांना पटवून देता आले. भारतातील वेगवेगळया प्रांतामध्ये असणाऱ्या स्थानिकांना इंग्रजी भाषेमुळे एकत्र आणता आले. यामुळे पाश्चिमात्य साहित्याची ओळख झाली त्यातून राष्ट्रवाद निर्माण झाला.

लोकशाही विचार

इंग्रज हे लोकशाहीचा पुरस्कार करणारे पहिले राज्यकर्ते होते. त्यांनी समाजाकडे पाहत असताना गरीब, श्रीमंत, उच्च, नीच, सवर्ण, अवर्ण असा भेद कधी केला नाही. नोकरीमध्येही सर्वांना समान संधीची भाषा ते बोलत असे. तसेच भारतासारख्या खंडप्राय व विविधतेने नटलेल्या देशात स्थिरावायचे असेल तर सर्वांना बरोबरीने घेऊन जावयास हवे असे त्यांना वाटत व हीच गोष्ट राष्ट्रवादाला खतपाणी घालणारी ठरली. इंग्रजांमुळे सर्वसामान्यांना राष्ट्रीय चळवळीत घेण्याचा प्रयत्न सर्वांनी केला.

पाश्चिमात्त्यांचा संपर्क 

इ. स. १६०० पासून इंग्रजांचा व इतर परकीयाचा वावर भारतामध्ये असल्याचे दिसते. या सर्वांचे राहणीमान, त्यांचे बोलणे, स्वदेशाबद्दल त्यांच्यामध्ये असणारी आपुलकीची भावना तसेच स्वदेशाचे हित जोपासण्याची त्यांची विचारधारा यामुळे भारतीयांच्यात एकीकरणाची व स्वदेशाबद्दलची भावना प्रखरपणे वाढीस लागली. पाश्चात्य तत्त्वज्ञान व तत्त्वव्येत्ते यांचा विचार भारतीयांच्या मनावर रुजला. जगातील अनेक क्रांत्यांचा व विचारांचा परिणाम हिंदी जनतेवर घडून आला.

धर्म सुधारणा 

राजा राममोहन रॉय, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती इत्यादींनी हिंदू तत्त्वज्ञान सोपे करुन सांगितले. भारतीय धर्म, संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ कशी आहे हे पटवून दिले. यामुळे भारतीयांच्यात स्वाभिमान जागृत झाला. त्यातूनच राष्ट्रवादाचा उदय झाला. अनेक धर्म सुधारकांनी धार्मिक सुधारणेच्या चळवळी घडवून आणल्या.

सामाजिक सुधारणा 

धार्मिक पुर्नर्जागरण व समाज प्रबोधनाचे कार्य करण्यासाठी डॉ. भांडारकर, न्या.रानडे, आत्माराम पांडुरंग, महात्मा फुले, बाबा पद्मजी तुरुलंग, आगरकर, विवेकानंद, देवेंद्रनाथ टागोर, ईश्वरचंद्र विद्यासागर, श. बॅनर्जी नटराजन या लोकांनी कार्य केले. यांनी दलितोद्धार, स्त्री सुधारणा, धर्म जागृती इत्यादी सुधारणा केल्या. त्यामुळे भारतीयांच्यात एकी निर्माण होण्यास मदत झाली. सामाजिक चळवळींनी जाती प्रथा, अस्पृश्यता, स्त्री कनिष्ठता व इतर अनिष्ट प्रथांना विरोध केला. त्यामुळे भारतीय समाज जागृत झाला.

लॉर्ड लिटनची दडपशाही

लॉर्ड लिटन १८७६-८० या काळात भारताचा व्हाईसरॉय होता. लॉर्ड लिटनने व्हर्नाक्युलर ॲक्ट पास करवून घेतला. त्यांनी आपले प्रतिगामी धोरण अवलंबले होते.

  • १८७८ च्या दुष्काळात ५० लाख मृत्यु, उपाय केला नाही.
  • दुष्काळात प्रचंड खर्च करुन व्हिक्टोरिया राणीला हिंदूस्थानची सम्राज्ञी असा किताब दिला.(१८७७)
  • भारतीयांना परवानगीशिवाय शस्त्र बाळगता येणार नाही. (शस्त्रबंदी कायदा १८७८)
  • स्पर्धा परीक्षांचे वय २१ वरुन १९ वर आणले.
  • कापडावरील आयातकर रद्द केला. (५%)

यामुळेच भारतीयांच्यात एकी निर्माण झाली व भारतीय जनता जागृत झाली व राष्ट्रीय आंदोलनात उतरला.

हिंदी सुशिक्षितांवर अन्याय 

ब्रिटीशांना स्वत:च्या संस्कृतीचा व वर्ण श्रेष्ठत्वाचा दूराभिमान होता. ते भारतीयांना तुच्छ मानत असत. १८५७ च्या उठावानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली. सार्वजनिक ठिकाणी भारतीय सुशिक्षितांची मानहानी केली जात. नोकरीमध्ये अन्याय पक्षपाती वागणूक, स्त्रियांची मानहानी अशा पक्षपाती धोरणांुळे सुरेंद्रनाथ बॅनर्जीने सनदशीर मार्गाची, चळवळीची सुरुवात केली. इंग्रजी भाषेुळे सुशिक्षित भारतीयांना ज्यांनी प्रारंभीच्या काळात चळवळीचे नेतृत्त्व केले त्यांना विचारांची देवाण-घेवाण करणे, परस्परांशी संपर्क साधणे, देशहिताची चर्चा करणे शक्य झाले होते.

इलबर्ट बिल 

लॉर्ड रिपनच्या सांगण्यावरून कायदामंत्री लॉर्ड इलबर्ट याने भेदभाव नाहीसा करणारे बिल कायदे मंडळात मांडले. ते बील पुढीलप्रमाणे आहे –

  1. अफगान युद्धाचा शेवट
  2. आर्म्स ॲक्ट व व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट रद्द
  3. हिंदी लोकांना नोकऱ्या.

ब्रिटिशांचा उदारमतवाद 

भारतीयांच्याबाबत सहानुभूती बाळगणारे अनेक इंग्रज अधिकारी होते. तसेच काही प्रमाणात भारतीयांना उदारतेची, सहानुभूतीची वागणूक दिली. या जाणिवेमुळेच भारतीयांच्यात एकी निर्माण झाली. प्रशासकीय कामासाठी पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार भारतात सुरू झाला. मिल्टन, शेले बेंथममिल, रुसो, वाल्टेअर यांच्या विचारांनी भारतातील बुद्धीजीवीमध्ये स्वातंत्र्याची, राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली.

वृत्तपत्रांची भूमिका

१९ व्या शतकात भारतीय भाषांधून वृत्तपत्रे निघू लागली. यातून जनजागृती वैचारिक एकता निर्माण करण्याचे कार्य झपाट्याने झाले. या वृत्तपत्रांनीच भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी योग्य वातावरण निर्मिती केल्याचे दिसते, इंग्रजांची धोरणे, त्यांची पिळवणूकीचे प्रकरण तसेच सामान्यावर झालेला अन्याय या सर्वांना वाचा फोडण्याचे कार्य वृत्तपत्रांनी केले. 

वंशवादाचा अहंकार 

ब्रिटीश हे परकीय असून त्यांनी जगातील अनेक भूभागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यांना स्वत:चा वंश श्रेष्ठ वाटत होता व बाकीच्यांना ते गुलामाप्रमाणे वागवत. त्यामुळे गोरा-काळा हा भेदभाव करण्यास सुरुवात केली. प्रशासनातील उच्च पदे भारतीयांना दिली जात नव्हती. सार्वजनिक ठिकाणी भारतीयांना प्रवेश नाही. राजकीय सवलती नाहीत. दळणवळणामध्ये वेगळी सोय. नोकऱ्यांध्ये दुजाभाव असा दिसून आला. परिणामी, भारतीयांच्यात एकी होऊन त्यांच्यात राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली. ब्रिटिशांच्या या वंशद्वेषी धोरणामुळे भारतीयांची अस्मिता, स्वाभिमान जागा झाला होता.

मध्यमवर्गाचा उदय

भारतामध्ये अनेक राजे, सरंजामदार ब्रिटीश आगमनावेळी दिसून येतात. या समाजरचनेत परिवर्तन होऊन नवीन जमिनदार, शेतकरी, सावकार, व्यापारी वर्ग उदयास आले. १८७० नंतर या वर्गाने इंग्रजांविरुद्ध राष्ट्रीय भावनेस खतपाणी घातले. शासनाच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्त्व करण्याचे काम या मध्यम वर्गाने केले.

भारतीय साहित्यिकांचे कार्य 

भारतीय राष्ट्रवादास वैचारिक बैठक प्राप्त करुन देणारे लेखक – विष्णुशास्त्री चिपळूनकर (निबंधमाला), स्वातंत्र्यवीर सावरकर (मित्रमेला), रविंद्रनाथ टागोर (जन-गण-मनराष्ट्रगीत), कवी गोविंद, देशबंधू चित्तरंजन दास (स्वराज्य पक्ष), बकिमचंद चॅटर्जी (आनंदमठ). ईेशरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी यांनी राष्ट्रप्रे निर्माण करणारे लिखाण लिहिले. या व अशा वेगवेगळया लेखकांनी वेगवेगळया भाषांधून समाजजागृती घडवून आणली. तसेच विलियम जोन्स, मॅक्स मूलर, रॉय व ससान यासारख्या परकीय साहित्यिकांनी केलेल्या लिखानातून भारताची समृद्ध संस्कृती समोर आली. त्यामुळे भारतीयांना आपल्या गौरवशाली संस्कृतीची ओळख पटली.