राज्यसभा

राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. पूर्वीच्या council of states चे नामकरण १९५४ मध्ये राज्यसभा असे केले गेले.राज्यसभा हे राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे.

रचना

 • राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्यसंख्या २५० इतकी असते. यापैकी २३८ राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे असतात. १२ सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात .
 • सध्या राज्यसभेत २४५ सदस्य आहेत. यापैकी २२९ राज्याचे प्रतिनिधी अाहेत तर ४ केंद्रशासित प्रदेशांचे अाहेत. १२ सदस्य राष्ट्रपतीनियुक्त आहेत.

  राज्याचे प्रतिनिधी राज्यांच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून निवडून दिले जातात. राज्यसभेत राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व आहे. केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी अप्रत्यक्षपणे प्रमाणशीर प्रतिनिधीत्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे निर्वाचित केले जातात. राष्ट्रपतींना साहित्य, विज्ञान, कला व समाजसेवा या क्षेञातील विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या १२ व्यक्तींना राज्यसभेवर नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे.

कार्यकाळ

 • राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. त्याचे १/३ सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात.
 • संविधानाने राज्यसभा सदस्यांच्या कार्यकाळाबाबत कोणतीही तरतूद केलेली नसून हा विषय संसदेकडे सोपवला आहे. संसदेने लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ पारित करून  राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षे इतका निश्चित केला आहे.

सदस्यत्व पाञता

 • भारतीय नागरिक
 • ३० वर्षे वय
 • संसदेने विहित केलेल्या इतर पाञता

अपाञता

 • लाभाचे पद धारण केले तर
 • न्यायालयाने वेडा ठरवले तर
 • दूसर्या देशाचे नागरिकत्व स्विकारले तर
 • दिवाळखोर असेल तर
 • संसदेने केलेल्या इतर कोणत्याही कायद्याने तो अपाञ ठरत असेल तर

  पक्षांतरबंदी कायदयानुसार अपाञता– एखादा संसद सदस्य घटनेच्या १० व्या परिशिष्ठातालील तरतूदीनुसार अपाञ ठरू शकतो जर

 • एखादा सदस्य ज्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आला असेल त्या पक्षाचे सदस्यत्व सोडतो.
 • एखाद्या सदस्याने त्याच्या पक्षाच्या निर्देशाच्या विरुध्द मतदान केले किंवा मतदानास अनुपस्थित राहिला.
 • अपक्ष सदस्याने कोणत्याही पक्षात प्रवेश केला.
 • नामनिर्देशित सदस्याने त्याच्या निवडीनंतर सहा महिन्यानंतर कोणत्याही पक्षात प्रवेश केला.

राज्यसभेचा सभापती

 • उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो.