राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. हा युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून दरवर्षी दिला जातो. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर “चार वर्षाच्या कालावधीत क्रीडाक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल” सन्मानित केले जाते. 1991-92 मधील कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलेला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद हा पुरस्कारप्राप्त पहिला खेळाडू होता. 2001 मध्ये, क्रीडा नेमबाज अभिनव बिंद्रा (18 वर्षांचा असताना) हा पुरस्कार स्वीकारणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला.

पुरस्काराचे स्वरूप

या पुरस्कारामध्ये एक पदक, एक प्रमाणपत्र आणि 7.5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते.

पुरस्कारप्राप्त खेळाडू

पुरस्कारप्राप्त खेळाडू
१९९१-९२विश्वनाथन आनंदबुद्धिबळ
१९९२-९३गीत सेठीबिलियर्ड्‌स
१९९३-९४पुरस्कार देण्यात आला नाही
१९९४-९५होमी मोतीवालानौकानयन (सांघिक खेळ)
१९९४-९५पी. के. गर्गनौकानयन (सांघिक खेळ)
१९९५-९६के. मल्लेश्वरीभारोत्तलन
१९९६-९७लिअँडर पेसअनुक्रमे टेनिस
१९९६-९७एन. कुंजराणीभारोत्तलन
१९९७-९८सचिन तेंडुलकरक्रिकेट
१९९८-९९ज्योतीर्मयी सिकदरॲथलेटिक्स
१९९९-२०००धनराज पिल्लेहॉकी
२०००-०१पुलेला गोपीचंदबॅडमिंटन
२००१-०२अभिनव बिंद्रानेमबाजी
२००२-०३अंजली वेदपाठक भागवतनेमबाजी
२००२-०३के.एम. बीनामोलॲथलेटिक्स
२००३-०४अंजू बॉबी जॉर्जॲथलेटिक्स
२००४-०५राज्यवर्धनसिंग राठोडनेमबाजी
२००५-०६पंकज अडवाणीबिलियर्ड्‌स आणि स्नूकर
२००६-०७मानवजीतसिंग संधूनेमबाजी
२००७-०८महेंद्रसिंग धोणीक्रिकेट
२००८-०९मेरी कोम (विभागून)बॉक्सिंग
२००८-०९विजेंदर सिंग (विभागून)बॉक्सिंग
२००८-०९सुशील कुमार (विभागून)कुस्ती
२००९-१०सायना नेहवालबॅडमिंटन
२०१०-११गगन नारंगनेमबाजी
२०११-१२विजय कुमार ,नेमबाजी
२०११-१२ योगेश्वर दत्तकुस्ती
2013 रंजन सोढीनेमबाजी
2014 पुरस्कार देण्यात आला नाही
2015सानिया मिर्झाटेनिस
2016पी. व्ही. सिंधूबॅडमिंटन
2016दिपा कर्मकारजिमनॅस्टिक्स
2016जितू रायशूटिंग
2016साक्षी मलिककुस्ती
2017देवेंद्र झाझारियापारा एथलीट
2017सरदार सिंगहॉकी

 

Leave a Reply