राजीव गांधी किशोरी सशक्तीकरण योजना- सबला

सबला या योजनेची सुरूवात २०१० मध्ये किशोरी शक्ती योजना(२०००) व Nutrition Programme and Adolescent Girls (NPAG) या दोन योजनांचे एकञीकरण करून झाली.

 • देशातील निवडक २०० जिल्ह्यांमध्ये(सध्या २०५  जिल्ह्यांमध्ये) ICDS योजनेचा प्लॅटफॉर्म वापरून अंगणवाडीच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे.
 • केंद्रस्तरावर महिला व बालकल्याण मंञालय या योजनेचे प्रशासन पाहते.
 • पोषणाव्यतिरिक्त इतर खर्चावर १०० टक्के केंद्राचे सहाय्य तर पोषणावर ५० टक्के केंद्राचे सहाय्य.

उद्दिष्टे

 • किशोरींना स्व-विकास व सबलीकरणासाठी सक्षम करणे
 • त्यांची पोषण व आरोग्यविषयक स्थिती सुधारणे.
 • आरोग्य, पोषण, स्वच्छता, लैंगिक आरोग्य, कुटुंब व बालकांची काळजी याबद्दल जागृती करणे.
 • त्यांची गृह व जीवन कौशल्ये विकसित करणे व व्यावसायिक कौशल्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाशी जोडणे.
 • शाळाबाह्य किशोरींना अौपचारिक ⁄ अनौपचारिक शिक्षण प्रवाहात आणणे.
 • सार्वजनिक सेवा जसे प्राथमिक आरोग्य केंद्र, पोस्ट आॅफिस, बॅंक, पोलिस स्टेशन याबाबत मार्गदर्शन ⁄ माहिती देणे.

लक्ष्य गट

या योजनेत देशातील निवडक २०० जिल्ह्यांतील ११ ते १८ या वयोगटातील किशोरी या लक्ष्य गट आहेत. हा लक्ष्य गट दोन उपगटात विभाजित केला आहे. ११ ते १५  आणि १५ ते १८.

सबला योजनेंतर्गत सेवा

या योजनेंतर्गत पुढील सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

 • पोषण- प्रत्येक किशोरीला दररोज ६०० कॅलरी, १८ ते २० ग्रॅम प्रथिने व सूक्ष्मपोषके असा पूरक आहार वर्षातील ३०० दिवस पुरवला जातो. ११ ते १५ वयोगटातील शाळाबाह्य मुलींना व १५ ते १८वयोगटातील सर्व मुलींना पूरक आहाराचा पुरवठा धान्याच्या स्वरूपात केला जातो. याबाबत वित्तीय पुरवठा ३०० दिवस प्रतिदिनी ५ रूपये या दराने होतो.
 • लोह आणि फॉलिक अॅसिडचा पुरवठा- किशोरी दिना दिवशी लोह आणि फॉलिक अॅसिडच्या १०० गोळ्यांचा पुरवठा.
 • आरोग्य तपासणी- तीन महिन्यांतून एकदा किशोरी दिना दिवशी सामान्य आरोग्य तपासणी होते.
 • पोषण आणि आरोग्य शिक्षण-
 • कुटुंब कल्याण, बालकांची काळजी याबाबत मार्गदर्शन
 • जीवनावश्यक कौशल्ये व सार्वजनिक सेवाबाबत मार्गदर्शन
 • व्यावसायिक शिक्षण

Leave a Reply