रक्ताभिसरण संस्था (Blood Circulation System)

रक्ताभिसरण संस्था (Blood Circulation System) ही मानवी शरीरातील तसेच सृष्टीतील प्रत्येक जीवासाठी एक अत्यंत महत्वाची अशी कार्यसंस्था आहे. विलीयम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध सर्वप्रथम लावला. म्हणून त्यांना ‘Circulator’ तसेच ‘Father of Angiology’ असे संबोधले जाते. त्यांनी रक्तवाहिन्यांचा अभ्यास सर्वप्रथम सापांवर केला.

मानवातील रक्ताभिसरण

 • रक्त नेहमी रक्तवाहिन्यामधून वाहत असते. पंपाप्रमाणे रक्त वाहते ठेवण्याचे कार्य हृदयाचे आहे. ह्रदयाला एकूण चार कप्पे असतात. ह्रदयातील वरचे दोन कप्पे म्हणजे अलिंद (कर्णिका) व खालचे दोन कप्पेे म्हणजे निलये (जेवनिका) होय. शरीराकडून ह्रदयाकडे येणारे रक्त स्विकारण्याचे कार्य अलिंदाचे असते व ह्रदयातील रक्त बाहेर घेऊन जाण्याचे काम निलये करतात.
 • उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते व डाव्या बाजूला शुद्ध रक्त असते. उजव्या बाजूला शरीराकडून आलेले रक्त फुफ्फुसाकडे पाठवले जाते. फुफ्फुसामध्ये रक्तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जाउन प्राणवायू शोषला जातो. हे रक्त हृदयाच्या डाव्या कर्णिकेत आणले जाते. आणि तेथून ते डाव्या जेवनिकेतुन शरीरभर पोहोच वले जाते. विविध शरीराची कामे करण्यासाठी प्राणवायू, साखर व इतर मूलद्रव्ये ही रक्तामार्फत शरीरभर नेली जातात. शरीर लागेल त्याप्रमाणे ऑक्सिजन व इतर पौष्टिक पदार्थ घेते व परत अशुद्ध रक्त हृदयाकडे पोहचवते.

 

मानवी ह्रदय

 • मानवी हृदय दर मिनिटाला सरासरी ७२ वेळा आकुंचन प्रसरण पावते.
 • इंग्रजीमध्ये ‘कार्डियाक’ हा हृदयासंबंधी आलेल्या शब्दाचा उगम ग्रीक भाषेतील कार्डिया (हृदय) शब्दाशी आहे.
 •  मानवी हृदयाचे वजन 250-350 ग्रॅम असून त्याचा आकार हाताच्या वळलेल्या मुठीएवढा असतो. स्त्रियामध्ये हृदयाचे सरासरी वजन 250-300 ग्रॅम आणि पुरुषामध्ये 300-350 ग्रॅम असते.
 • शीतरक्ताच्या प्राण्यांचे ह्रदय तीन कप्प्यांचे बनलेले असते. माशांमध्ये ह्रदय दोन कप्प्यांचे असते.
 • स्टेथोस्कोप या यंञाच्या साहाय्याने ह्रदयाचे ठोके ऐकले जातात.
 • ठोके जाणण्यासाठी मनगटाजवळील रॅडीयल धमणीचा वापर करतात.

१) रक्तवाहिन्या

धमणी/रोहिणी ()

 • या रक्तवाहिन्या ह्रदयापासून दूर शरीराकडे जातात व शरीराला आॅक्सीजनयुक्त रक्ताचा पुरवठा करतात.
 • फुप्फुस धमणी ही याला अपवाद असून ती अशुद्ध रक्ताचे वहन करते.
 • रक्तदाब धमण्यांमध्ये जास्त असल्यामुळे यांच्या भित्तीका इलास्टिक व स्नायूयुक्त असून या शिरांपेक्षा जाड असतात.

शिरा ()

 • या रक्तवाहिन्या शरीराच्या भागाकडून अशुद्ध रक्त घेऊन ह्रदयाकडे येतात.
 • फुप्फुसभीगा शीर ही याला अपवाद असून ती शुद्ध रक्ताचे वहन करते.
 • शिरांमध्ये रक्तदाब अतिशय कमी असल्यामुळे यांच्या भित्तीका पातळ व आतून पोकळीयुक्त असतात.

केशवाहिनी ()

 • धमणी व शिरा यांना जोडणार्या रक्तवाहिन्या.
 • एकाच थराने बनलेली पातळ पेशीभित्तीका.
 • रक्त आणि पेशी यांच्यातील वायूची, अन्नाची व उत्सर्जित पदार्थाची देवाणघेवाण केवळ केशवाहिन्यांमार्फत होते.

२) रक्त

 • मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते.
 •  रक्तामध्ये रक्तद्रव आणि रक्त पेशी असतात.

रक्तद्रव ()

 • रक्तामधील ५५% भाग रक्तद्रवाचा असतो.  रक्तद्रवा मध्ये ९०% पाणी, ७% रक्तरस प्रथिने, आणि ३% असेंद्रिय द्रव्ये (Inorganic substances) असतात.
 • तसेच रक्तद्रवात ग्लूकोज, अमिनो आम्ले आणि मेदाम्ला यांसारखी अन्नद्रव्येदेखील असतात.

रक्तपेशी ()

यामध्ये प्रामुख्याने तीन घटकांचा समावेश होतो.

RBC- Red Blood Cell/Corpuscles (लाल रक्तपेशी)

WBC- White Blood Cell/Corpuscles ( पांढर्या रक्तपेशी)

Platelets (बिंबीका/रक्तपट्टीका)

 1. RBC- Red Blood Cell/Corpuscles (लाल रक्तपेशी)

  केंद्रक नसलेल्या गोलाकार रक्तपेशी असून आकाराने अतिशय लहान असतात (७ मायक्रोमीटर व्यास, २.५ मायक्रोमीटर जाडी).  लाल रक्तपेशींमध्ये रक्तामधील हिमोग्लोबिन असतो जो प्राणवायू वाहून नेण्याचे कार्य करतो. या हिमोग्लोबिनमुळेच RBC चा रंग लाल असतो. पुरूषांपेक्षा स्ञीयांमध्ये RBC चे प्रमाण कमी असते. RBC साधारण १२७ दिवस जगतात.

 2. WBC- White Blood Cell/Corpuscles ( पांढर्या रक्तपेशी)

  केंद्रक असलेल्या आकाराने मोठ्या असणार्या या रक्तपेशी अमीबासदृश्य व रंगहीन असतात. यांचा आकार RBC पेक्षा जास्त असतो (८ ते १५ मायक्रोमीटर व्यास). WBC चे आयुर्मान केवळ ३-४ दिवस इतके कमी असते.

  पांढर्‍या रक्तपेशींचे न्युट्रोफिल्स, लिम्फोसाईट्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल व मोनोसाईट्स हे पाच प्रकार आहेत.

   

 3. Platelets (बिंबीका/रक्तपट्टीका)

केंद्रक नसलेल्या यांचा आकार द्विबहीर्वक्री असून त्यांना कोणताही रंग नसतो. या रक्तपेशी फक्त सस्तन प्राण्यांमध्येच आढळतात. आकाराने अतिशय लहान असतात (२.५ ते ५ मायक्रोमीटर व्यास). रक्तपट्टीका केवळ ५ ते १० दिवस जीवंत राहू शकतात.

 

रक्तदाब

 • हृदय हा एक स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. त्याच्या तालबद्ध हालचालीमुळे (आकुंचन पावणे (Systole) आणि प्रसरण पावणे (Diastole) रक्त शरीरभर फिरत असते. शरीरात रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो किंबहुना ज्या दाबाने रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असते त्या दाबाला ‘रक्तदाब’ (Blood Pressure) असे म्हणतात.
 • सर्व अवयवांना त्यांच्या त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे रक्तपुरवठा मिळण्यासाठी हा विशिष्ट प्रकारचा दाब आवश्यक असतो. तो निर्माण होण्यासाठी हृदयाची लयबद्ध हालचाल, रक्तवाहिन्यांची लवचीकता, रक्ताचे प्रमाण, हृदयाची गती आणि शरीरातील इतर स्रावांचे परिणाम (Hormones) या गोष्टी जबाबदार असतात.
 • हृदय आकुंचन पावते तेव्हा रक्त जोराने रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते त्याचा रक्तवाहिन्यांच्या अंतर-स्तरावर दाब अधिक असतो, त्या दाबाला सिस्टोलिक रक्तदाब (Systolic Blood Pressure) असे म्हणतात.
 • जेव्हा हृदय आरामदायी पूर्वस्थितीत (Relaxation Stage) येते तेव्हा रक्तवहिन्यांच्या अंतर-स्तरावरील दाब कमी होतो त्याला ‘डायास्टोलिक रक्तदाब (Diastolic Blood Pressure) असे म्हणतात.
 • दोन्ही प्रकारचे रक्तदाब ‘स्फिग्मोमॅनोमीटर’ या यंत्राच्या साहाय्याने मोजता येते.
 • वयाच्या ५० वर्षांपर्यंत सिस्टोलिक रक्तदाब हा ११० ते १४० (मी. मी. पारा.. mm of Hg) असायला हवा आणि डायास्टोलिक रक्तदाब हा ९०च्या पेक्षा कमी असायला हवा. सिस्टोलिक रक्तदाब हा १४० च्या वर किंवा डायास्टोलिक रक्तदाब हा ९० पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब किंवा अति रक्तदाब (Hypertension)आहे असे समजावे.

 

 

 

 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: