मोजमाप

आपल्या सभोवताली असलेल्या वस्तू किंवा पदार्थ मोजण्यासाठी त्यांच्या काही प्रमाण, राशी अथवा संख्येला एकक म्हणून वापरतात. मोजमाप (Measurement) करताना वेगवेगळ्या प्रकारच्या एकक पद्धतींचा वापर केला जातो. या पद्धतींचे वर्गीकरण त्यामध्ये लांबी, वजन आणि वेळ मोजण्यासाठी केलेल्या एककावरून केले आहे. त्यापैकी सर्वात जास्त प्रचलित ४ पद्धती पुढीलप्रमाणे –

एकक पद्धती (System of Units)

१. CGS पद्धत (CGS System / Metric System / French system): या पद्धतीमध्ये लांबी-सेंटीमीटर , वजन-ग्राम आणि वेळ-सेकंदात मोजली जाते.

२. FPS पद्धत(FPS system / British system of Units) : या पद्धतीमध्ये लांबी-फुट , वजन-पौंड आणि वेळ-सेकंदात मोजला जाते.

३. MKS पद्धत (MKS system of Units) : या पद्धतीमध्ये लांबी-मीटर , वजन-किलो आणि वेळ-सेकंदात मोजला जाते.

४. SI पद्धत (International System of Units) : या पद्धतीमध्ये लांबी-मीटर , वजन-किलो आणि वेळ-सेकंदात मोजला जाते. ही पद्धत १९६० ला जिनेव्हा येथे झालेल्या परिषदेनंतर सर्वमान्य झाली. या पद्धतीतील एककांचे दोन प्रकार पडतात –

अ. मुलभूत एकक (Fundamental Units)

ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसऱ्या राशीवर अवलंबून नसते त्यांना मुलभूत एकक म्हणतात. मूलभूत एकक खालील प्रमाणे आहेत.

मूलभूत एकक 
अ. क्र.मूलभूत राशीमूलभूत एककचिन्ह
लांबी (Length)मीटर(Meter)m
2वजन (Mass)किलोग्रॅमkg
काळ/वेळ (Time)सेकंदs
तापमान (Temperture)केल्वीनK
विद्युत धारा (Electric current)अम्पिअरA
तेजस्वी तीव्रताकॉन्डेलाcd
पदार्थाची राशी (Amount of substance)मोलmol

ब. साधित एकके (Derived Units)

जी भौतिक राशीची एकके मूलभूत एकाकाच्या मदतीने तयार होतात त्यांना साध्य एकक म्हणतात. काही साध्य एकके खालील प्रमाणे आहेत –

साध्य एकक
अ. क्र.भौतिक राशीसाध्य एकक(SI Unit)चिन्ह
बल (Force)न्यूटनN
उर्जा (Energy)ज्यूलJ
चाल (Speed)Meter/Secondm/s
वारंवारता (Frequency)hertzHz
संवेग ( Momentum )Kilogram Meter / Secondkg m / s
6दाब ( Pressure )Pascalpa
7शक्ती ( Power )wattW
8पृष्ठताण ( Surface Tension )newton per meterNm-१
प्रभार ( Charge )coulombC
१०विभव ( Potential )voltV
११रोध ( Resistance )ohm_०_
Additional SI units
12Plane AnglesRadianrad
13Solid AnglesSteradianSr
14Angular Velocityradian/secondrad/s
15Moment of inertiakilogram meter squarekg m2
16Angular Momentumkilogram meter swquare/ secondkg m2/s
17Viscositynewton second per meter squareN.s/m2
18CapacitancefaradF
19InductancehenryH
20Magnetic fluxweberWb
21Luminous fluxlumenlm
22Optical wavelengthangstromA0
23Impulsenewton secondN.s

सदिश व आदिश राशी

अ. सदिश राशी (Scalar quantity)-

ज्या भौतिक राशी दिशा व परिमाण (Direction and magnitude) या दोन्ही प्रकारात दर्शवितात त्यांना सदिश राशी म्हणतात. सदिश राशी दर्शविताना डोक्यावर बाण काढतात.

उदा. बल (Force), विस्थापन (Displacement), वेग (Velocity)  इत्यादी.

ब. अदिश राशी (Vector quantity)-

ज्या भौतिक राशी फक्त परिमाणाने दर्शवितात त्यांना अदिश राशी म्हणतात. दिशा आवश्यक नसते.

उदा. वजन (Mass), वेळ (Time), चाल (Speed)  इत्यादी.

Important Prefixes to Units

 
exa(E)  = (10)18peta (P) = (10)15
tera(T) = (10)12giga (G)=(10)9
mega(M) = (10)6kilo(K) =(10)3
hecto(h)=(10)2deka(da)=(10)1
deci(d)=(10)-1centi(c)=(10)-2
milli(m)=(10)-3micro(u)=(10)-6
nano(n)=(10)-9pico(p)(10)-12
femto(f)=(10)-15zatto(a)=(10)-18