मुख्यमंत्री सुकर्मी पुरस्कार

शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचा दर्जा सातत्याने उंचवण्यासाठी तसेच त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी या वर्षांपासून उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री सुकर्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात केली होती.

  • त्यानुसार या वर्षांपासून ही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • त्यानुसार दर वर्षी १२ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे.
  • मंत्रालय, विभाग व  जिल्हा स्तरावर वेगवेगळे पुरस्कार दिले जाणार आहेत. उद्दिष्टनिष्ठ व वैयक्तिकनिष्ठ अशा दोन निकषांवर कर्मचारी-अधिकाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.
  • २१ एप्रिल हा दर वर्षी नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला जाणार आहे.