मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा

१० डिसेंबर १९४८ रोजी UN च्या सर्वसाधारण सभेने मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा मंजूर केला.

या जाहीरनाम्यातील १ ते २१ कलमांमध्ये राजकीय हक्क समाविष्ट आहेत तर त्यानंतरच्या कलमांमध्ये सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक हक्क समाविष्ट आहेत.

मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा

मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा

कलम १

सर्व मानव जन्मतः स्वतंत्र असून सर्व सन्मान आणि हक्कांच्या बाबतीत सर्व व्यक्ती समान आहेत

कलम २

या जाहीरनाम्यात नमूद केलेल्या हक्कांचा आणि स्वातंत्र्याचा सर्वांना लाभ घेता येईल याबाबत वंश वर्ण लिंग भाषा धर्म राजकीय व इतर कुठलेही मत राष्ट्रीय व इतर कुठलीही सामाजिक मूळ दारिद्र्य जन्म व इतर कुठल्याही आधारावर कसल्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही

कलम ३

प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा स्वातंत्र्याचा आणि व्यक्तिगत सुरक्षेचा हक्क आहे

कलम ४

कोणत्याही व्यक्तीला गुलामगिरीत ठेवता येणार नाही गुलामगिरीचे गुलामांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घातली जाईल

कलम ५

कोणत्याही व्यक्तीचा छळ केला जाऊ नये किंवा कुणालाही क्रूर अमानवी किंवा अपमानास्पद वागणूक अथवा शिक्षा देता येणार नाही

कलम ६

कायद्या समोरील व्यक्ती म्हणून सर्वत्र मान्यता मिळवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे

कलम ७

कायद्यासमोर सर्वजण समान आहेत आणि सर्वांना कायद्याचे समान संरक्षण घेण्याचा अधिकार आहे

कलम ८

घटनेने किंवा कायद्याने दिलेल्या मूलभूत हक्कांच्या उल्लंघन करणाऱ्या कृतीबाबत सक्षम लवादाकडे परिणामकारक दाद मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे

कलम ९

कोणत्याही व्यक्तीस बेकायदेशीररित्या तुरुंगात टाकता येणार नाही किंवा तडीपार करता येणार नाही

कलम १०

प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र निपक्षपाती लवादासमोर न्याय आणि खुल्या सुनावणीचा हक्क आहे

कलम ११

गुन्हेगारी स्वरूपाचा आरोप असणारी व्यक्ती जोपर्यंत सुनावणी होऊन न्यायालयातर्फे दोषी ठरवले जात नाही तोपर्यंत ती व्यक्ती निर्दोष आहे असे गृहीत धरले गेले पाहिजे आणि सदर खटल्यात त्या व्यक्तींना स्वतःची बाजू बांधण्याची हमी दिली गेली पाहिजे

कलम १२

कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात कुटुंबात पत्रव्यवहारात किंवा प्रत्येकाचा सन्मान व प्रतिष्ठा यात नाहक हस्तक्षेप करू दिला जाणार नाही

कलम १३

प्रत्येक व्यक्तीला राष्ट्राच्या सीमा अंतर्गत भागात कुठेही जाण्याचा आणि राहण्याचा हक्क आहे. प्रत्येकाला स्वतःच्या राष्ट्र सह इतर कुठल्याही राष्ट्रातून बाहेर जाण्याचा आणि स्वतःच्या राष्ट्रात परत येण्याचा हक्क आहे

कलम १४

प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या राष्ट्रात आश्रय मागण्याचा आणि तेथे राहण्याचा हक्क आहे

कलम १५

प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रीयत्व मिळवण्याचा बदलण्याचा व बेकायदेशीर रित्या हिरावून घेतले  न जाण्याचा हक्क आहे

कलम १६

प्रत्येक व्यक्तीला वंश राष्ट्रीयत्व धर्म अशा कोणत्याही बंधना विना विवाह करण्याचा अधिकार आहे

कलम १७

प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्ररीत्या व सामूहिक रित्या मालमत्ता धारण करण्याचा अधिकार आहे कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता बेकायदेशीररित्या हिरावून घेता येणार नाही

कलम १८

प्रत्येक व्यक्तीला विचारस्वातंत्र्य धर्मस्वातंत्र्य आणि श्रद्धा स्वातंत्र्य व त्याचे आचरणाचे स्वातंत्र्य आहे

कलम १९

प्रत्येक व्यक्तीला मत स्वातंत्र्य आणि हे मत प्रकट करण्याचे स्वातंत्र्य याचा हक्क आहे

कलम २०

प्रत्येक व्यक्तीला शांततापूर्ण मार्गाने एकत्र येण्याचे व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे

कलम २१

प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशाच्या  सरकारात प्रत्यक्षपणे अथवा प्रतिनिधी मार्फत सहभागी होता येईल

कलम २२

प्रत्येक व्यक्तीला समाजाचा एक सदस्य या नात्याने सामाजिक सुरक्षेचा हक्क आहे

कलम २३

प्रत्येक व्यक्तीला काम करण्याचा आपल्या पसंतीच्या रोजगाराची निवड करण्याचा कामासाठी न्याय व अनुकूल परिस्थिती असल्याचा आणि बेरोजगारी पासून संरक्षण मिळण्याचा हक्क आहे.  प्रत्येक व्यक्तीला समान कामासाठी समान वेतन मिळण्याचा हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीला न्याय वेतन मिळण्याचा हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कामगार संघटना स्थापन करण्याचा आणि अशा संघटनेत सहभागी होण्याचा हक्क आहे

कलम २४

प्रत्येक व्यक्तीला विश्रांतीचा आणि विरंगुळ्याचा हक्क आहे

कलम २५

प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्य आणि कल्याणासाठी पुरेसे राहणीमान राहण्याचा हक्क आहे. या हक्कांमध्ये अन्न वस्त्र निवारा आरोग्य सेवा अशा सामाजिक सेवांचा समावेश होतो त्याशिवाय प्रत्येक व्यक्तीला बेकारी आजारपण अपंगत्व वैधव्य म्हातारपण किंवा स्वतःच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीमुळे निर्वाळा मिळणे अशक्य झाल्यास सुरक्षा मिळण्याचा हक्क आहे.

कलम २६

प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार आहे किमान प्राथमिक आणि मूलभूत स्तरावरील शिक्षण विनामूल्य मिळण्याचा हक्क आहे.  प्राथमिक शिक्षण सक्तीचे असले पाहिजे तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण सर्वांना उपलब्ध असले पाहिजे आणि गुणांच्या आधारावर उच्चशिक्षण घेणे सर्वांना उपलब्ध पाहिजे. मुलांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या प्रकाराची निवड करण्याचा अधिकार पालकांना आहे

कलम २७

प्रत्येक व्यक्तीला आपल्या सामाजिक सांस्कृतिक जीवनात खुलेपणाने सहभागी होण्याचा कलेचा उपभोग घेण्याचा वैज्ञानिक प्रगतीचा लाभाचा उपयोग घेण्याचा अधिकार आहे

कलम २८

या जाहीरनाम्यातील सर्व हक्कांची आणि स्वातंत्र्याची पूर्तता होईल अशा सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्थितीचा प्रत्येक व्यक्तीला हक्क आहे

कलम २९

आपल्या हक्कांच्या आणि स्वातंत्र्याचा वापर करताना प्रत्येक व्यक्तीवर इतरांच्या हक्कांचा आणि स्वातंत्र्याचा आधार आदर करण्याचे निर्बंध राहतील.  संयुक्त राष्ट्रसंघाच्या कुठल्याही उद्दिष्टाच्या अथवा तत्त्वांच्या विरोधात या हक्कांचा व स्वातंत्र्याचा वापर करता येणार नाही

कलम 30

या जाहीरनाम्यातील कुठल्याही तरतुदीचा अन्वयार्थ लावून कुठल्याही राष्ट्रास या जाहीरनाम्यात नमूद केलेल्या हक्कास व स्वातंत्र्यास बाधा येणारी कृती करता येणार नाही