माझी कन्या भाग्यश्री योजना

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलीचे शिक्षण, आरोग्याचा दर्जा वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात दि. १ एप्रिल २०१६ पासून माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) तसेच वार्षकि उत्पन्न एक लाखापर्यंत असणारी (एपीएल) कुटुंबे पात्र ठरविण्यात येत होती. दि. १ऑगस्ट २०१७ पासून सुधारित योजना साडेसात लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्व घटकांतील कुटुंबांना लागू असणार आहे.

  1. योजनेंतर्गत एका मुलीनंतर माता किंवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून मुलीच्या नावे ५० हजार रुपये, तर दोन मुलींनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येईल.
  2. या मुदत ठेवीवरील व्याज मुलीला वयाच्या सहाव्या आणि बाराव्या वर्षी काढता येईल. तसेच मुद्दल आणि व्याज दोन्ही रक्कम वयाच्या १८व्या वर्षी काढता येईल.
  3. योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय १८ र्वष पूर्ण असणे आणि दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासह वयाच्या १८ र्वष पूर्ण होईपर्यंत ती अविवाहित असणे आवश्यक आहे.
  4. कुटुंबात पहिले व दुसरे अपत्य मुलगी असल्यास योजनेचा लाभ घेता येईल. मात्र तिसरे अपत्य जन्मल्यास त्यास या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. पहिल्या दोन्ही अपत्यांचेही लाभ बंद होतील. मात्र दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्या तर त्या योजनेस पात्र असतील.
  5. बालगृहातील मुलींसाठी ही योजना लागू असणार आहे.
  6. लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक असेल.
  7. एका मुलीच्या जन्मानंतर एक वर्षांच्या आत तर दोन मुलींनंतर ६ महिन्यांच्या आत माता किंवा पिता यांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  8. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत लाभार्थी मुलगी व तिची आई यांच्या नावे संयुक्त बचत खाते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये उघडण्यात येईल. त्यामुळे दोघींना एक लाख रुपयांचा अपघात विमा व ५ हजार रुपये ओव्हरड्राफ्ट व इतर लाभ प्राप्त होतील.