महाराष्ट्र : स्थान, विस्तार व सीमा

 • स्थान व विस्तार

महाराष्ट्राचे स्थान भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून आहे.

महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार :- 15अंश 08 उत्तर ते 22 अंश 01 उत्तर अक्षांश. 

महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार :- 72 अंश 06 पुर्व ते 80 अंश 09 पुर्व रेखांश. 


लांबी रुंदी व क्षेत्रफळ

महाराष्ट्राची दक्षिण-उत्तर लांबी 700 किमी एवढी आहे. तर पुर्व-पश्चिम लांबी 800 किमी एवढी आहे. 

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ :- 03,07,713 चौ किमी एवढे आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 09.36 टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक आहे. (प्रथम-राजस्थान, द्वितीय- मध्य प्रदेश)


सीमा

उत्तरेस मध्यप्रदेश, ईशान्येस व पुर्वेस छत्तीसगढ, आग्नेयेस तेलंगणा, दक्षिणेस गोवा व कर्नाटक, पश्चिमेस अरबी समुद्र व वायव्य बाजुस गुजरात व दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहे. दिव-दमण हा केंद्रशासीत प्रदेश महाराष्ट्राला लागून नाही. तो पुर्णत: गुजरात मध्ये येतो.महाराष्ट्रास सर्वाधिक सीमा मध्यप्रदेशची व सर्वात कमी सीमा गोवा राज्याची लाभलेली आहे.

नैसर्गिक सीमा: वायव्येस- सातमाळा डोंगर, उत्तरेस- सातपुडा पर्वत, ईशान्येस- दरकेसा टेकड्या, पूर्वेस- चिरोली टेकड्या व भामरागड डोंगर, दक्षिणेस-हिरण्यकेशी नदी व कोकणात तेरेखोल नदी व पश्चिमेस अरबी समुद्र.


महाराष्ट्र: राजकीय स्वरूप

सध्या महाराष्ट्रात ६ प्रशासकीय विभाग, ३६ जिल्हे आणि ३५८ तालुके आहेत.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात चार प्रशासकीय विभाग,  २६ जिल्हे व २३५ तालुके होते. त्यानंतर

 • रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा (1 मे १९८१)
 • चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली जिल्हा (२६ ऑगस्ट १९८२)
 • औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना जिल्हा (१ मे १९८१)
 • उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर जिल्हा (१६ ऑगस्ट १९८२)
 • मुंबई जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई उपनगर जिल्हा (१ ऑक्टोबर १९९०)
 • धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा (१ जुलै १९९८)
 • अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशीम जिल्हा (१ जुलै १९९८)
 • परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली जिल्हा (मे १९९९)
 • भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा (मे १९९९)
 • पालघर जिल्हा 1 ऑगस्ट 2014 .. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होउन नविन जिल्हा निर्माण झाला.

हे जिल्हे अस्तित्वात आले.


प्रशासकीय विभाग

१) कोकण ( ७ जिल्हे, ५० तालुके)

जिल्हे- मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर.

२)औरंगाबाद (८ जिल्हे, ७६ तालुके)

जिल्हे- औरंगाबाद जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, परभणी जिल्हा

३) अमरावती (५ जिल्हे, ५६ तालुके)

जिल्हे- अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशीम जिल्हा

४) नागपूर (६ जिल्हे, ६४ तालुके)

नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, वर्धा जिल्हा

५) नाशिक (५ जिल्हे, ५४ तालुके)

नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, अहमदनगर जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा

६) पुणे (५ जिल्हे ५८ तालुके)

कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा


 

स्थानिक स्वराज्य संस्था

 1. महाराष्ट्रामध्ये एकूण 2७ महानगरपालिका आहेत.
 2. 30 मे 2010 रोजी “वसई विरार” जिल्हा ठाणे ही 23 वी महानगरपालिका अस्तित्वात आली. 
 3. 2011 मध्ये चंद्रपुर, परभणी व लातुर या 03 नवीन महानगरपालिका अस्तित्वात आल्या आणि २०१६ मध्ये पनवेल ही २७ वी महानगरपालिका अस्तित्वात आली आहे.    
 4. महाराष्ट्रात सध्या 22६ नगर परिषदा आहेत. 
 5. नगर पंचायती 05 आहेत. (शिर्डी जि नगर, कणकवली जि सिंधुदर्ग, दापोली जि रत्नागिरी, केज जि बीड, मलकापुर जि. सातारा.)
 6. महाराष्ट्रात एकूण 07 कटक मंडळे आहेत. ( देहू, खडकी, पुणे कॅम्प, देवळाली- नाशिक, भिंगार – अहमदनगर, कामठी – नागपूर, आैरंगाबाद)
 7. भारतामध्ये एकूण 62 कटक मंडळे आहेत.
 8. महाराष्ट्रात 3४ जिल्हा परीषदा आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर येथे जिल्हा परीषदा नाहीत.
 9. पंचायत समिती 335 एवढया आहेत.

 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

9 thoughts on “महाराष्ट्र : स्थान, विस्तार व सीमा”

error: