महाराष्ट्र: खनिजसंपत्ती

महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी केवळ 12.33 % क्षेत्रात खनिजसंपत्ती आढळते. महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीची मुख्य क्षेत्रे- पूर्व विदर्भ, कोकण व दक्षिण महाराष्ट्र, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नागपूर, यवतमाळ, भंडारा कोल्हापूर व गोंदिया हे जिल्हे

खनिजमहाराष्ट्रातील

साठा

जिल्हेउपयोग
मँगनीज20%भंडारा,

गोंदिया,

नागपूर व 

सिंधुदुर्ग 

(सर्वाधिक साठे – भंडारा)

पोलाद उद्योग, खत उद्योग
लोहखनिज

शुद्धतेनुसार प्रकार-

मॅग्नेटाईट-72.4%

हेमेटाईट-69.90%

लिमोनाईट-55.00%

सिडेराईट-48.20 %

20%गडचिरोली,

सिंधुदुर्ग,

भंडारा,

चंद्रपूर,

गोंदिया व

नागपूर

लोह व पोलाद उद्योग,

मूलभूत व जड उद्योग

बॉक्साईट21%कोल्हापूर,

रायगड,

सातारा,

सांगली,

ठाणे व

रत्नागिरी

(सर्वाधिक साठे-कोल्हापूर)

 

ॲल्युमिनियम निर्मिती,

वाहन उद्योग,

सिमेंट उद्योग.

 

क्रोमाईट10 %नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूरधातू उद्योग,

किंमती खड्यांवर प्रक्रिया,

रसायन उद्योग व

काच उद्योग.

चुनखडी9%चंद्रपूर,

गडचिरोली,

यवतमाळ,

नागपूर व

नांदेड

(चंद्रपूर- सर्वात जास्त साठे)

बांधकाम उद्योग
डोलोमाईट1 %नागपूर, यवतमाळ व गडचिरोली90 % उत्पादन लोह-पोलाद निर्मितीसाठी 

10 % उत्पादन खत कारखान्यात 

कायनाईट 

व सिलिमनाईट

15 %भंडारा 

हिऱ्यांना पैलू पाडण्याचे उद्योग,

काच सामान,

रसायन उद्योग,

सिमेंट उद्योग

वीजेची उपकरणे निर्मिती उद्योग


 

अत्यल्प प्रमाणात आढळणारी खनिजे

खनिजजिल्हेउपयोग
पायरोफायलाईटभंडारा व चंद्रपूरसिरॅमिक,

रंग उद्योग,

किटकनाशके व

रबर निर्मिती उद्योग

ग्रॅफाईटसिंधुदुर्गबॅटरी उद्योग,

ल्यूब्रिकंट उद्योग

तांबे खनिजचंद्रपूर

नागपूर

इलेक्ट्रिक उद्योग
व्हॅनेडियमभंडारा

गोंदिया

मजबूतीसाठी पोलादामध्ये मिश्रित
टंगस्टननागपूरदुसऱ्या धातूंची मजबुती वाढवण्यासाठी मिश्रित
जस्तनागपूररंग, रबर, औषधनिर्मिती, बॅटरी, वस्त्रोद्योग,

सौंदर्य प्रसाधने तसेच इलेक्ट्रिक उपकरणे निर्मिती.

 

अभ्रकसिंधुदुर्गउष्णता अवरोधक म्हणून विद्युत उपकरणांमध्ये
गॅलियमनागपूरतापमापकांमध्ये पाऱ्याचा पर्याय
ग्रॅनाईटनागपूर,

चंद्रपूर,

गडचिरोली 

सिंधुदुर्ग

 बांधकाम उद्योग
 क्वार्टझाईट भंडारा 

गोंदिया

बांधकाम उद्योग
 बराईट चंद्रपूर

रत्नागिरी

बांधकाम उद्योग
 सिझियम भंडारा

गोंदिया

 अणू घड्याळे निर्मिती करण्यासाठी

दगडी कोळसा

भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रातील साठा- 4 % (राज्यातील एकूण साठा 5500 दशलक्ष टन)

नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा

महाराष्टकतील सर्व दगडी कोळसा हा अकोकक्षम  प्रकारचा आहे.

दगडी कोळशाचे शुद्धतेनुसार प्रकार :-

  1. ॲन्थ्रासाईट :- हा सर्वाधिक शुद्ध प्रकार आहे. याच्या ज्वलनाने अत्यधिक उष्णता निर्माण होते. तर अत्यल्प प्रमाणात राख शिल्लक राहते. यातील कार्बनचे प्रमाण – 80 ते 95 %
  1. बिटुमिनस :- शुद्धतेच्या दृष्टीकोनातून ॲन्थ्रासाईट नंतर या कोळशाचा क्रमांक लागतो. यातील कार्बनचे प्रमाण – 60 ते 80 %
  1. लिग्नाईट :- शुद्धतेच्या दृष्टीकोनातून तिसरा क्रमांक.  यातील कार्बनचे प्रमाण – 40 ते 55 %
  1. पीट :- सर्वाधिक अशुद्ध प्रकारचा कोळसा. याच्या ज्वलनाने अतिशय कमी उष्णता निर्माण होते आणि अधिक प्रमाणात राख शिल्लक राहते. यातील कार्बनचे प्रमाण – 40 % पेक्षा कमी.