महानगरपालिका

शहरी/नागरी स्वराज्य संस्थांमधील सर्वोच्च स्तर महानगरपालिका हा आहे. भारतामध्ये १६८८ मध्ये मद्रास शहरासाठी पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात आली.

 • १८८८ मध्ये मुंबई महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचा कारभार मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ नुसार चालतो.
 • महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांचा कारभार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार चालतो.
 • महानगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार राज्य शासनास आहे. भारतीय संविधानाच्या २४३ कलमामध्ये महानगर पालिका स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे.
 • सर्वसाधारणपणे महानगर पालिका स्थापन करण्यासाठी शहराची लोकसंख्या ३ लाखांपेक्षा अधिक असावी लागते.

महानगरपालिकेची रचना

महानगरपालिकेची सदस्य संख्या कमीत-कमी ६५ व जास्तीत-जास्त २२१ असते. जास्तीत-जास्त ५ नामनिर्देशित सदस्य असतात. मुंबई महापालिकांकरिता सदस्य संख्या २२७ इतकी निश्चित केली आहे. महानगरपालिकेची सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे. मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांतील सदस्यांची संख्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार निश्चित केली जाते.

नामनिर्देशित सदस्य –

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार महानगरपालिकेवर पाच नामनिर्देशित सदस्य घेतले जातात.  महानगरपालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान, वैद्यकीय व्यवसायाचा अनुभव, सामाजिक कार्याचा अनुभव, नगरसेवकाचा अनुभव, मनपा आयुत्त, नगरपरिषद मुख्याधिकारी इत्यादी पदांचा अनुभव असणाऱ्या व्यत्तींना महानगरपालिकेवर नामनिर्देशित केले जाते़.

महानगरपालिका नामनिर्देशित सदस्यांची पात्रता

 • नगरपालिका रुग्णालयांत वैद्यकीय व्यवसाय कमीतकमी ५ वर्षांचा अनुभव
 • सामाजिक सेवेचा किमान ५ वर्षे अनुभव
 • नगरसेवक म्हणून ५ वर्षांचा अनुभव
 • नगर परिषदेचा मुख्याधिकारी म्हणून ५ वर्षांचा अनुभव
 • कामगार कायद्यांची माहिती व त्या क्षेत्रातील कार्याचा अनुभव (नामनिर्देशित सदस्यांना महानगरपालिकेच्या  कामकाजामध्ये सहभाग घेता येतो; मात्र त्यांना मतदान करण्याचा अधिकार नसतो.)

महापौर व उपमहापौर

महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. महापौर हे नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सुचविले. निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची महापौर व एकाची उपमहापौर म्हणून निवड करतात. दोघांचाही कार्यकाल प्रत्येकी अडीच वर्षे एवढा असतो.

राखीव जागा –

महिला50%
OBC27%
SC/STलोकसंख्येच्या प्रमाणात

राजीनामा –

नगरसेवकमहापौराकडे
उपमहापौरमहापौराकडे
विषय समिती सभापतीमहापौराकडे
महापौरमहानगर पालिका आयुक्ताकडे

महापौरांची कार्ये –

 • महापौर हा महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख असतो.
 • महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठका बोलाविणे व त्यांचे अध्यक्षस्थान स्वीकारणे.
 • महानगरपालिकेच्या कामकाजाची तपासणी करणे.

महानगरपालिका आयुक्त

निवड – केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)

नेमणूक – राज्यशासन

कार्ये –

 • अंदाजपत्रक तयार करणे
 • महानगरपालिकेच्या वतीने करार करणे व कराराची
 • माहिती स्थायी समितीला करणे.
 • कनिष्ठ कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे.
 • महानगरपालिकेच्या धोरणाची अंमलबजावणी करणे.
 • महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे.