महात्मा फुले जन आरोग्य योजना

राज्य शासनाने या जुन्या योजनेच्या धर्तीवर नविन उपचारांचा समावेश असलेली महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे.

लाभार्थी

  • दारिद्रय़ रेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका धारक व दारिद्रय़ रेषेवरील केशरी शिधापत्रिका धारक (रु.१ लाखापयंत वार्षिक उत्पन्न असलेली) कुटुंबे (शासकीय, निमशासकीय कर्मचारी व आयकरदाते वगळून)

लाभार्थी ओळख

  • राज्य शासनाने निश्चित केल्यानुसार योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबास देण्यात येणारे आरोग्य ओळखपत्र किंवा असंघटीत कामगार ओळखपत्र / स्मार्ट कार्ड किंवा राज्य शासन निर्धारित करील अशा इतर कोणत्याही पुराव्याच्या आधारे ओळख पटवण्यात येऊ शकते.

खर्चाची मर्यादा

  • योजनेंतर्गत समाविष्ट उपचारांसाठी कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा सरंक्षण रक्कम प्रतिवर्ष प्रती कुटुंब रु. २.०० लाख एवढी असेल
  • मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सदर मर्यादा प्रती वर्ष / प्रती कुटुंब रु. ३.०० लाख असेल. यामध्ये दात्याचा समावेश आहे.
  • या योजनेंतर्गत उपचार सुरु होण्यापूर्वी असलेल्या आजारांचा समावेश राहील.

योजनेतील अंगीकृत रुग्णालये

राज्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी अंगीकृत रुग्णालये संख्येची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. त्याचबरोबर ट्रॉमाकेअर,ऑन्कॉलॉजी इत्यादी विशेषज्ञ सेवांसाठी प्राधान्याने रुग्णालये अंगीकृत करण्यात येतील. आवश्यकता भासल्यास अपवादात्मक परिस्थितीत सीमावर्ती राज्यातील शासकीय रुग्णालयांना एका वर्षांसाठी अंगीकृत करण्यात येईल.