महर्षी विठ्‌ठल रामजी शिंदे

जन्म 
 • विठ्‌ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे झाला.
 • १८ व्या वर्षी ते मॅट्रिक पास झाले व पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए.झाले.
 • मॅट्रिकनंतर शिक्षक व कारकुणाची नोकरी केली.
समाजकार्य
 • वि.रा.शिंदे यांनी १९२४ साली वायकोस (केरळ) येथे अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला.
 • पुणे येथील पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रहात सक्रिय सहभागी होते. ज्यांना मानवी हक्क पाहिजेत त्यांनी इतर समाजाला मानवी हक्क दिले पाहिजेत हे त्याचे मत होते.
 • १९०३ साली सयाजीराव गायकवाड (बडोद्याचे संस्थानिक) यांनी दिवाण पद देवू केले परंतु त्यांनी ते नाकारले. पद दलितांची सेवा करण्यास प्राधान्य दिले.
 • प्रार्थना समाजाचे कार्य केले.
 • वि.रा.शिंदे यांना जातीचे मोठेपण मान्य नव्हते. ते अस्पृश्यांच्या वस्तीत जावून राहिले. मराठा समाज त्यांना ‘महार’ असे संबोधित असे.
 • डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना मुंबईत १६ ऑक्टोंबर १९०६ रोजी अस्पृश्यता निवारण कार्यासाठी केली. त्याचा उद्‌देश अस्पृश्य समाजात शिक्षण प्रसार करणे, अस्पृश्यांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देणे,  त्यांच्या सामाजिक अडचणी सोडवणे. अस्पृशांच्या मुलांसाठी मोफत वस्तीगृह चालवणे.
 • या संस्थेच्या कार्याला अनेक उदार दात्यांनी आर्थिक मदत दिली. त्यामुळे या संस्थेच्या देशभर अनेक शाखा कार्य करत होत्या. पुणे नगरपालिकेने संस्थेच्या कार्यासाठी ७ एकर जागा मोफत दिली होती. इंदोरच्या तुकोजी होळकरांनी २०००० रु.देणगी दिली. महर्षी शिंदेनी या संस्थेचे व्यवस्थापन अस्पृश्य मंडळींच्या हाती देवून एक आदर्श समाजापुढे ठेवला.
 • वि.रा.शिंदे हे अस्पृश्यतेच्या प्रश्नाचे संशोधन करणारे पहिले संशोधक म्हणून ओळखले जातात. १९३३ साली त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ लिहला.

निधन – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे २ जानेवारी १९४४ रोजी निधन झाले