महर्षी धोंडो केशव कर्वे

महर्षी धोंडो केशव कर्वे यांना २० व्या शतकातील अग्रणीचे समाजसुधारक मानण्यात येते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी वाहून घेतले. महर्षी कर्वेंनी विधवांच्या पुनर्विवाह घडवून आणणे व स्त्रीशिक्षणाचा प्रसार करणे यासाठी मेहनत घेतली.

जन्म व शिक्षण 
 • महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी रत्‍नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरवली या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
 • इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या  कालखंडात महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात गणित हा विषय शिकवला.
 • वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. पुढे इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला.
म. कर्वे यांचे शैक्षणिक कार्य
 • महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी राधाबाईंचा मृत्यू झाल्यावर पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. समाजाकडून या विवाहास प्रचंड विरोध झाल्याने अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते.
 • इ.स. १८९६ मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स.१९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली.
 • बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये त्यांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ ची स्थापना केली. इ.स. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले.
 • विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली.
 • महर्षी कर्वे यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून १९०७ मध्ये हिंगणे येथे महिला विद्यालय सुरु केले.
 • इ.स. १९१० साली आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘`निष्काम कर्म मठा’ची स्थापना केली
 • स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण व्हावे या हेतूने त्यांनी ३ जून १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी अनेक महाविद्यालये सुरु केली.  १९२० मध्ये सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी २० लाख रुपयांची देणगी दिल्याने त्यांच्या आईचे नाव या महिला विद्यापीठाला नंतर देण्यात आले. आता या विद्यापीठाचे नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (SNDT) असे आहे.
 • महाविद्यालयामध्ये शिकविण्यासाठी शिक्षक तयार व्हावेत. यासाठी त्यांनी १९१७ मध्ये अध्यापिका विद्यालय सुरु केले. त्यांच्या या कार्यामुळे या स्त्रीशिक्षण व स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीची चळवळ गतीमान झाली.
 • पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीने महर्षी कर्वेंना आजीव सदस्यत्व बहाल केले होते.
 • मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिले.
 • महर्षी कर्वे यांना पुढील विद्यापीठांनी क्रमाने पदव्या बहाल केल्या –

D.Lit – बॅनर्स विद्यापीठ (१९४२), पुणे विद्यापीठ (१९५१), S.N.D.T. महिला विद्यापीठ (१९५४) या विद्यापीठांनी कर्वेंना डी. लिट. हि पदवी दिली.

L.L.D. – मुंबई विद्यापीठाने कर्वेंना १९५७ साली L.L.D. हि सर्वोच्च पदवी दिली.

 • महर्षी कर्वेच्या सामाजिक कार्यामुळे विशेषतः स्त्रीशिक्षणामुळे त्यांना `पद्मविभूषण‘ हा किताब इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला तर १९५८ मध्ये देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ देऊन गौरविण्यात आले.