मवाळवाद्यांचे राजकारण

मवाळवाद्यांची उद्दिष्ट्ये :

 1. सनदशीर मार्गाने सरकारपुढे मागण्या मांडणे.
 2. लोकशाही शासन पद्धतीचा विकास व्हावा.
 3. भारताच्या प्रगतीसाठी इंग्रजांशी एकनिष्ठ रहाणे.
 4. भारताच्या जनतेला जागृत करणे.

प्रमुख मवाळवादी नेते :

 1. उमेशचंद्र बॅनर्जी वि. वेडरबर्न लाल मोहन घोष
 2. दादाभाई नौरोजी फिरोजशहा मेहता सर हेन्री कॉरल
 3. ब्रहुद्दिन तय्यबजी आनंद चार्ल गोपाळ कृष्ण गोखले
 4. जॉर्ज युल उमेशचंद्र बॅनर्जी न्या. रानडे
 5. अल्फ्रेड वेब रहमतुल्ला सयानी
 6. शंकर नायर चंद्रावर
 7. आनंद मोहनबोस दिनशा वाच्छा
 8. रमेशचंद्र दत्त सुरेंद्रनाथ बॅनर्जी

१८८५ ते १९०५ च्या दरम्यान मवाळवाद्यांनी केलेल्या मागण्या :

 1. ग. ज. मंडळात वृद्धी व्हावी.
 2. ग. ज. मंडळात भारतीयांचा समावेश असावा.
 3. भारतमंत्रीपद रद्द व्हावे.
 4. लष्करावरील खर्च कमी व्हावा.
 5. लष्करी खर्चासाठी भारतीयांवर बोजा लादू नये.
 6. सैन्यात भारतीयांना मानाची पदे द्यावीत.
 7. कापडउद्योगाला पुनरुज्जीवन द्यावे.
 8. नविन उद्योगांना प्रोत्साहन द्यावे.
 9. न्यायव्यवस्था व शासनव्यवस्था अगल असाव्यात.
 10. खउड परीक्षा भारतात घ्यावी.
 11. वृत्तपत्रावर बंधणे घालू नयेत.
 12. दारुबंदी कराावी.
 13. मीठावरील कर रद्द करावा.
 14. ICS परीक्षेचे वय २३ पर्यंत वाढवावे.
 15. ब्रह्मदेश खालसा करू नये.

मवाळ काँग्रेसची विचारसरणी (१८८५ ते १९०५) :

इंग्रजांबरोबर एकनिष्ठतेचे धोरण :

इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांवर परदेशी लेखकांच्या विचारांचा पगडा होता. भारतीयांना राज्यकारभाराचे ज्ञान नाही हे ज्ञान करुन घेण्यासाठी इंग्रजांशी एकनिष्ठ राहावे अशी विचारसरणी मवाळांची होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या मते, इंग्रजांची सत्ता भारतात असणे भारतातील विविध वर्गांना एकराष्ट्र म्हणून विकसित होण्यासाठी आवश्यकता आहे. देशासाठी ते एक वरदान आहे.

उदारमतवादी विचारसरणी :

राष्ट्रीय सभेच्या मोठ्या नेत्यावर इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव अधिक होता. परिणामी, त्यांना प्रगत व पुरोगामी विचार भारतीयांना समजावेत तसेच इंग्रजांचे अनेक नियम माहिती करुन घ्यावेत यासाठी इंग्रजांचे राज्य भारतीयांवर असावे असे मवाळवाद्यांना वाटत होते. काँग्रेसचे ध्येय मर्यादित होते. मार्ग सौम्य होता. भारतीय लोकांतील राजकीय जागृती त्यांना महत्त्वाची वाटत होती.

इंग्रजी राज्य – ईश्वरी राज्य :

याचे कारण सांगताना मवाळवादी खालील आधार घेतात.

 1. विभागलेला भारत एक झाला.
 2. कायद्यापुढे सर्वांना समान मानले.
 3. भौतिक सुधारणा केल्या.

अशा अनेक गोष्टीमुळे मवाळवाद्यांना इंग्रजांची राजवट ही ईश्वरी राजवट आहे असे मानत होते.

इंग्रजांच्या न्यायावर विश्वास :

सर फिरोजशहा मेहता म्हणतात, ‘‘इंग्रज न्यायप्रिय आहेत याबद्दल कसलीही शंका नाही म्हणून ते काँग्रेसच्या मागण्यांचा प्रेमपूर्वक विचार करतील.’’ नामदार गोखले, ‘‘भारतात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे काम केवळ इंग्रजच करू शकतात.’’ अशा स्वरूपाचे विचार मवाळवाद्यांचे होते व त्यामुळेच आपल्या समस्या त्यांना समजावून सांगाव्यात असे ते म्हणत.

शांततेवर विश्वास :

भारतीयांनी आपले हक्क व मागण्या मान्य करण्यासाठी शांततेच्या मार्गाने जावे. त्यामुळे ते आपला विचार नक्की करतील असे मवाळांना वाटत होते. त्यामुळे मवाळवाद्यांनी अर्ज, विनंत्या, निवेदने यावर भर दिला. त्यांना त्यांच्या कार्यावर विश्वास होता.

सुधारणा टप्प्याटप्प्याने मिळाव्यात :

सनदशीर मार्गांचा अवलंब करुन अर्ज, विनंत्या करुन एक एक सुधारणा आपल्याला मिळवून घ्याव्यात असे त्यांना वाटत व यासाठी इंग्रजांचा एक घटक म्हणून कार्य करावे असे त्यांना वाटे. मागण्यांचा सतत पुनरुच्चार करून त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. सुधारणा करुन घेतल्या.

मवाळ गटाचे कार्य :

वसाहतींचे स्वराज्य :

लॉर्ड कर्झनची दडपशाही, भारतीय तरुणांच्यातील असंतोष, बंगालची फाळणी या अनेक गोष्टींमुळे मवाळ वाद्यांना आपले जुने धोरण बदलावे लागेल. १९०५ च्या वाराणसी अधिवेशनास नामदार गोखले यांनी वसाहतींचे स्वराज्य मिळावे अशी मागणी केली.

लोकांत उत्साह निर्माण केला :

सुरुवातीच्या काळात मवाळवादी इंग्रजांवर टिका करीत होते. परंतु बंगालच्या फाळणीला त्यांनी तीव्र विरोध करुन आपली चळवळ जनमानसात नेली. या घटनेुळे भारतीयांच्यात राष्ट्रप्रेम व स्वाभिमान जागृत होण्यास मदत झाली. आपण सर्व भारतीय एक आहोत ही भावना जनमानसात रुजली गेली.

युरोपियनांचा पाठिंबा मिळविला :

भारतीयांचे अडचणी समजावून घेऊन त्यांच्यात सुधारणा व्हावी या दृष्टीने इंग्रजांनाही भारतीयांबद्दल सहानुभूती वाटत होती. यासाठी १८९० साली ब्रिटीश समिती स्थापन केली. आयर्लंड मध्येही अशाच चळवळी सुरू झाल्या होत्या. १८९४ मध्ये आल्फ्रेड वेब यांना काँग्रेसचे अध्यक्ष केले. यामुळेच इंग्लंडधील उदारमतवादी लोकांच्या मनात भारतीयांच्यात बाबतीत सहानुभूती निर्माण करण्यामध्ये काँग्रेस प्रयत्न करीत. काँग्रेसची शिष्टंडळेही इंग्लंडला जात होती.

परदेशी भारतीयांचे संरक्षण :

भारताप्रमाणे इंग्रजांनी आफ्रिका व आशिया खंडातील अनेक देशांवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्या ठिकाणी मजूरीसाठी गेलेल्या भारतीयांचा छळ थांबविण्यासाठी राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून भारतीयांनी प्रयत्न केले. मद्रास अधिवेशनामध्ये तसा ठरावही मांडला. यातील ठरावानुसार काळा-गोरा भेद नाहीसा व्हावा व आपल्या बांधवांना अधिकार मिळावेत असा प्रयत्न केला गेला.

मागण्यांध्ये विविधता :

भारतीयांना इंग्रजांच्या प्रती कोणताही सन्मान नव्हता. यामुळे भारतीयांसाठी राष्ट्रीय सभेने विविध मागण्या केल्या. व या मागण्यामध्ये वेगळेपणा जाणवतो.

 1. भारतीयांच्या समस्येसाठी रॉयला कमिशन नेणे.
 2. सनदीसेवेसाठीची वयोर्यादा.
 3. भेदभाव नाहीसे करणारे नियम करणेबाबत.
 4. सनदीसेवा परीक्षा भारतामध्ये ठेवणे.
 5. शेतकऱ्यांना व्याजदर कमी असावा.
 6. स्थानिक स्वराज्य संस्थाबाबतचे अधिकार.
 7. जनतेचे कर कमी करावेत.

अशा मागण्यांध्ये वैविध्यत्ता असल्यामुळे भारतीयांच्यामध्ये ही चळवळ लोकप्रिय ठरली.

 

 

 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: