मनोधर्य योजना

मनोधर्य योजना ही बलात्कार, ऑसिड हल्ला याला बळी पडलेल्या महिला आणि लंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या बालकांचे पुनर्वसन व त्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी दि. २ ऑक्टोबर २०१३ पासून राज्यामध्ये सुरू करण्यात आली.

  • घटनेचा परिणाम म्हणून महिला किंवा बालकास कायमचे मतिमंदत्व/अपंगत्व आल्यास तसेच सामूहिक बलात्कारांच्या प्रकरणात गंभीर इजा झाल्यास किंवा अ‍ॅसिड हल्ल्यामध्ये चेहरा विद्रुप झाल्यास १०लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येईल.
  • अ‍ॅसिड हल्ल्यामध्ये प्लास्टिक सर्जरी करावी लागल्यास शासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयात करण्यात येईल व त्याचा संपूर्ण खर्च विधी सेवा प्राधिकरण मंजूर करेल.
  • अ‍ॅसिड हल्ल्यामध्ये जखमी झाल्यास रु. ३,००,०००पर्यंत अर्थसाहाय्य देण्यात येईल.
  • अन्य प्रकरणांमध्ये रु. १,००,००० पर्यंत अर्थसाहाय्य देण्यात येईल.
  • यापकी ७५ टक्के रक्कम १०वर्षांसाठी पीडितांच्या नावाने बँकेत मुदत ठेव म्हणून तर २५ टक्के रकमेचा धनादेश तात्काळ देण्यात येईल.
  • अर्थसाहाय्य पीडितांच्या / पीडित बालकाच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये देण्यात येईल.