मंञीमंडळ

भारतीय संविधानाच्या कलम ७४ अन्वये राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंञीमंडळ असेल आणि राष्ट्रपती आपली कार्ये पार पाडताना अशा सल्ल्यानुसार वागेल.

नियुक्ती

कलम ७५(१) अन्वये मंञ्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या सल्ल्यावरुन राष्ट्रपती करतात.

मंञीमंडळाची संख्या

मंञीमंडळातील पंतप्रधानासहित मंञ्यांची एकूण संख्या लोकसभेतील एकूण सदस्यांच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असत नाही.

पाञता

मंञी म्हणून नेमणूक होणारी व्यक्ती संसदेच्या कोणत्याही सभागृहाची सदस्य असावी. संसदेच्या कोणत्याही सभागृहाची सदस्य नसणारी व्यक्ती मंञी म्हणून नियुक्त केली तर सहा महिन्यांच्या आत तिने संसदेच्या कोणत्याही सभागृहात सदस्य म्हणून निवडून येणे आवश्यक आहे.

संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य जर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत सदस्य म्हणून अपाञ ठरविला गेला तर असा सदस्य मंञी म्हणून नियुक्तीस अपाञ असेल.

पदावधी

मंञी राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात.

शपथ

मंञ्याने आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतींच्या समक्ष पद व गोपनियतेची शपथ घ्यावी लागते. मंञ्यांच्या शपथेचा नमुना संविधानच्या तिसर्या अनुसूचीत देण्यात आला आहे.

वेतन व भत्ते

मंञ्यांचे वेतन व भत्ते संसदेने वेळोवेळी कायद्याद्वारे निश्चित केल्याप्रमाणे असतात.