भारतीय संविधानाची वैशिष्टे

भारतीय संविधानाची वैशिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

सर्वात मोठे लिखित संविधान (Lengthiest Written Constitution)

भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. मूळ संविधानात प्रास्ताविका, ३९५ कलमे व ८ परिशिष्ठे होती. सध्या संविधानात प्रास्ताविका, ४६५ कलमे व १२ परिशिष्ठे आहेत. जगातील कोणत्याही संविधानात एवढ्या कलमांचा समावेश नाही. विविध देशांच्या संविधानातील कलमांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

देश कलमांची संख्या
यु. एस. ए.
आॅस्ट्रेलिया १२८
चीन १३८
कॅनडा १४७

संविधान एवढे विस्तृत होण्यासाठी पुढील बाबी कारणीभूत ठरल्या-

 1. देशाचा मोठा भाैगोलिक विस्तार व विविधता.
 2. १९३५ च्या कायद्याचा संविधानावर पडलेला प्रभाव.
 3. केंद्र व राज्यांसाठी एकच संविधान (अपवाद- जम्मु व काश्मिर)
 4. संविधानसभेत कायदेपंडितांचे असलेले प्राबल्य.

अनेक स्ञोतांपासून तयार केलेले संविधान (Drawn from Various Sources)

भारतीय संविधान तयार करताना विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास करण्यात आला. इतर देशांच्या संविधानातील चांगल्या तरतूदी भारतीय संविधानात समाविष्ठ करण्यात आल्या. माञ असे करताना त्या तरतूदींमध्ये भारतीय परिस्थितीशी सुसंगत असे बदल करण्यात आले.

 1. भारत सरकार कायदा १९३५– संघराज्य व्यवस्था, गव्हर्नर, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीविषयक तरतूदी.
 2. ब्रिटीश संविधान– संसदीय शासनपद्धती, कायद्याचे राज्य, कायदेनिर्मितीची प्रक्रिया, एकेरी नागरिकत्व, कॅबिनेट व्यवस्था, संसदीय विशेषाधिकार, द्विगृही कायदेमंडळ.
 3. अमेरिकन संविधान– मुलभूत हक्क, न्यायमंडळाचे स्वातंञ्य, न्यायालयीन पुर्नविलोकन, राष्ट्रपतींवरील महाभियोग प्रक्रिया, उपराष्ट्रपती पद, सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना काढून टाकण्याची पद्धत.
 4. आर्यलॅंडचे संविधान– शासनाच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतींच्या निवडणूकीची पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांची नामनिर्देशनाने नियुक्ती.
 5. कॅनडाचे संविधान– केंद्र प्रबळ असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे सोपविण्याची तरतूद, केंद्राकडून गव्हर्नरांची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकारक्षेञ.
 6. आॅस्ट्रेलियन संविधान– समवर्ती सूची, व्यापार व वाणिज्य स्वातंञ्य, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक.
 7. जर्मनीचे वायमर संविधान– आणीबाणीच्या काळात मुलभूत हक्क स्थगित होण्याची तरतूद.
 8. सोव्हियत संविधान– मुलभूत कर्तव्ये, प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे तत्व.
 9. दक्षिण आफ्रिकेचे संविधान– घटनादुरुस्तीची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक.
 10. फ्रांसचे संविधान– गणराज्य, प्रास्ताविकेतील स्वातंञ्य, समता व बंधुता ही तत्वे.
 11. जपानचे संविधान- कायद्याने प्रस्थापित केलेली पद्धत हे तत्व.

संघराज्य राज्यव्यवस्था (Federal System)

भारतिय संविधानाच्या कलम १ मध्ये भारताचे वर्णन राज्यांचा संघ असे केले आहे. माञ भारतीय संविधानाने संघराज्यीय शासनपद्धती निर्माण केली आहे. संघराज्य पद्धतीची अनेक वैशिष्टे संविधानात आढळतात. उदा. केंद्र व घटकराज्यांचे अस्तित्व, केंद्र-राज्य अधिकार विभागणी, लिखित संविधान, संविधानाची सर्वोच्चता, ताठर संविधान, स्वतंञ न्यायव्यवस्था व द्विगृही कायदेमंडळ

माञ त्याचबरोबर भारतीय संविधानात एकात्मिक राज्यव्यवस्थेचीही वैशिष्टे आढळतात. उदा. प्रबळ केंद्र, एकेरी नागरीकत्व, एकात्मिक न्यायव्यवस्था, केंद्राद्वारे राज्यपालांची नियुक्ती, आणीबाणीविषयक तरतूदी व अखिल भारतीय सेवा

यामुळेच भारतीय संविधानाचे वर्णन तज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे केले आहे.

के. सी. व्हिअर अर्ध-संघराज्य
माॅरिस जोन्स वाटाघाटींचे संघराज्य
ग्रॅनविल आॅस्टिन सहकारी संघराज्य
आयव्हर जेनिंग्ज प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारे संघराज्य
पाॅल अॅपलबी अति संघराज्यीय व्यवस्था
के. संथानम एकात्मतेकडे झकणारे संघराज्य
अॅलेक्झान्ड्रोविक्झ सु जेनेरिस

संसदीय शासनपद्धती (Parliamentary Government)

भारताने अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय शासनपद्धती न स्वीकारता ब्रिटनप्रमाणे संसदीय शासनपद्धती स्वीकारली आहे. अध्यक्षीय शासनपद्धतीमध्ये कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ परसपरांपासून विभक्त केलेले असतात. तर संसदीय शासनपद्धतीमध्ये त्यांच्यामध्ये सहकार्य व समन्वय असतो.

भारतीय संसदीय शासनव्यवस्थेची वैशिष्टे

 1. राष्ट्रपती नामधारी प्रमुख तर पंतप्रधान वास्तविक प्रमुख
 2. मंञीमंडळाची सामुहिक जबाबदारी
 3. मंञी संसदेचे सदस्य असतात
 4. लोकसभेत बहुमत असणार्या पक्षाचे सरकार
 5. लोकसभेचे विसर्जन

लवचिकता व ताठरता यांचा समन्वय (Blend of Rigidity and flexibility)

संघराज्यीय व्यवस्था असणार्या देशांमधील घटना लिखित व ताठर स्वरूपाच्या असतात. उदा. यु. एस. ए., स्वित्झरलॅंड, आॅस्ट्रेलिया. म्हणजेच या देशांच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी विशेष पद्धतीचा अवलंब करावा लागतो. तर ब्रिटनसारख्या एकात्म देशाची घटना ही लवचिक आहे.

भारताच्या घटनेत बदल करण्यासाठी ३६८ कलमामध्ये दोन पद्धतीचा समावेश केलेला आहे. या दोन्ही पद्धती अवघड असल्याने त्याबाबतीत घटना ताठर आहे. माञ घटनेतील काही तरतूदीत संसदेच्या साध्या बहुमताने दुरूस्ती करता येते. अशा तरतूदींच्या बाबतीत भारतीय घटना लवचिक आहे.

एकेरी नागरिकत्व  (Single Citizenship)

साधारणपणे संघराज्यीय शासनव्यवस्थेत नागरिकांना दुहेरी नागरिकत्व प्रदान केले जाते. संघराज्याचे व संबंधित घटकराज्याचे. माञ भारतीय घटनेने नागरिकांना एकेरी नागरिकत्व प्रदान केले आहे.

मुलभूत हक्क (Fundamental Rights)

मार्गदर्शक तत्वे (Directive Principles Of State Policy)

मुलभूत कर्तव्ये (Fundamental Duties)

आणीबाणीविषयक तरतूदी (Emergency Provisions)

एकात्मिक व स्वतंञ न्यायव्यवस्था (Integrated judiciary)

धर्मनिरपेक्षता (Secularism)

मूळ संविधानात जरी धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख कोठेही केलेला नसला तरीही घटनेने धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केली आहे हे घटनेतील विविध तरतूदींवरून स्पष्ट होते. १९७६ च्या ४२ व्या घटनादुरूस्तीने घटनेच्या प्रास्ताविकेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द घातला.

सार्वञिक प्राैढ मतदान. (Universal Adult Franchise)

घटनेने लोकसभा व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूकांसाठी सार्वञिक प्राैढ मतदानाची तरतूद केलेली आहे. १८ वर्षे पूर्ण असणारा प्रत्येक नागरिक या निवडणूकांमध्ये मतदान करू शकतो. १९८८ च्या ६१ व्या घटनादुरूस्तीने मतदारांचे वय २१ वरून १८ करण्यात आले.

भारत स्वतंञ होताच धर्म, जात, लिंग, शिक्षण, संपत्ती असा भेदभाव न करता देशातील सर्व नागरिकांना मताधिकार बहाल करण्यात आला. लोकशाहीची अतिशय जुनी परंपरा असणार्या देशांतही महिलांना मताधिकार दीर्घ काळाने देण्यात आला होता. उदा.

देश महिलांना मताधिकार बहाल करण्यात आलेले वर्ष
यु. एस. ए. १९२०
ब्रिटन १९२८
यु. एस. एस. आर १९३६
फ्रान्स १९४५
इटली १९४८
स्वित्झरलॅंड १९७१
मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: