भारताचा परकीय व्यापार

भारताचा परकीय व्यापार : आकारमान रचना आणि दिशा

 भारताच्या आयात-निर्यात व्यापारात समाविष्ट होणाऱ्या वस्तू
अनुक्रमांक

आयात

निर्यात
1अन्नधान्येशेती व पूरक वस्तू
2खनिजतेलखनिज पदार्थ
3रसायने व औषधेकारखानदारी वस्तू
4लोखंड व पोलीदरसायने
5रासायनिक खतेपेट्रोलजन्य पदार्थ
6मोती व मौल्यवान रत्नेचहा, कॉफी, फळे, भाज्या तांदूळ, मांस, मासे
7यंत्रसामुग्रीअभियांत्रिकी वस्तू,
8वाहतूकीची साधने

तयार कपडे व हस्तोद्योगातील वस्तू

9कृत्रिम धागे व धातूकातडे व कातडी वस्तू, पादत्राणे

भारताच्या परकीय व्यापाराची रचना :

सामान्यपणे परकीय व्यापाराची रचना याचा अर्थ देशाच्या आयात व निर्याती मध्ये समाविष्ट होणाऱ्या वस्तू व सेवांच्या स्वरुपातील बदल होय. भारताच्या आयात-निर्यात रचनेमध्ये वेळोवेळी बदल झाल्याचे दिसून येते.

आयात रचना

भारताच्या आयात रचनेमधील बदल 

अ.नं.

आयात वस्तू

१९९०-९१

२००-०१

२०११-१२

१.

पेट्रोलजन्य पदार्थ

१०८१६

७१,५००

७,४२,७६४

२.

रासायनिक खते, कागद व धातू

७६५०

४,५७६

७६,१७४

३.

भांडवली वस्तू यंत्र सामुग्री

१०४७१

२५,२८०

२०,५३२

४.

निर्यातीशी संबधीत वस्तू

६६०३

२२,१००

१,४६,२२१

५.

अन्नधान्य व खाद्यतेल

९९

९०

३३६

६.

इतर

६६५५

एकूण आयात

४३१९४

२,३०,८७०

२३,४५,९७३

(स्त्रोत : दत्त सुंदरम्‌ ‘इंडियन इकॉनॉमी’ ५७ वी नवीन आवृत्ती-२०१२)

भारताच्या आयात रचनेत पुढील प्रमाणे बदल झाल्याचे दिसून येते.

१) अन्नधान्य :

हरितक्रांती पूर्वी भारतात गहू, तांदूळ इत्यादि प्राथमिक वस्तूंची आयात होत असे. हरितक्रांतीनंतर भारत अन्नधान्याच्या स्वयंपूर्ण झाला आहे. तथापी डाळी व खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यात अपयश आले. यामुळे अशा वस्तुंची आयात करणे क्रमप्राप्त ठरल्याचे दिसून येते.

२) पेट्रोलियम पदार्थ :

योजना काळात भारताचा आर्थिक विकास घडून आला १९९१ नंतर तर भारताची खुप आर्थिक प्रगती घडून आली दुचाकी, चारचाकी, बहुचाकी वहानांचे उत्पादन व उपभोग वाढत गेला. यामुळे पेट्रोल, डिझेल, ऑईल इत्यादि मागणी वाढत गेली परंतु देशांतर्गत उत्पादन मर्यादित असल्याने पेट्रोलियम पदार्थांची आयात २०११-१२ या वर्षापर्यंत ७ लाख कोटी रूपयांच्या वर गेली.

३) खते :

योजना काळात हरितक्रांती घडून आली. नविन पिक लागवड, पिकांचे संगोपन इ. साठी रासायनिक खतांची खूप गरज असते. यामुळे १९९१ नंतर देखील खतावरील आयात मुल्य ५५ हजार कोटी रूपयांच्या वर वाढत गेल्याचे दिसून येते.

४) रसायने व औषधे :

सन १९९४ नंतर रूपयाचे अवमुल्यन वाढती लोकसंख्या नवनवीन आजारावरील औषधांची मागणी वाढत गेली यामुळे औषधाच्या आयातीवरील खर्च वाढत गेल्याचे दिसून येते.

५) मौल्यवान रत्ने :

भारतीय लोकांना पूर्वीपासून सोने, हिरे, मोती इत्यादि चे आकर्षण आहे. यामुळे मौल्यावान रत्नांच्या आयातीत वाढ झाली. यामुळे आयात मूल्यात देखील खूप वाढ झाल्याचे दिसून येते.

६) धातू :

भारतात लोह, पोलाद आणि इतर अलोह धातूची आयात केली जाते. १९९१ नंतर लोह व अलोह धातूंची आयात ४ लाख ७६ हजार कोटी रूपयांवर गेल्याचे दिसून येते.

७) यंत्रसामुग्री :

भारताने आर्थिक विकासाचे धोरण ठेवले आहे. यामुळे रेल्वे इंजिन, विजेवर चालणारी यंत्रे इत्यादि ची आयात करण्यात आली. यामुळे आयात मुल्य १ लाख ८७ हजार कोटी रूपयाहून अधिक झाल्याचे दिसून येते.

८) भांडवली वस्तू :

भारताने औद्योगिकरण घडवून आणण्याचे धोरण ठेवले. यामुळे नवीन भांडवली साधने, यंत्रसामुग्रीची आयात करण्यात आली. परिणामी आयात मुल्यात वाढ झाल्याचे दिसून येते.

निर्यात रचना :

भारत पूर्वीपासून तलम कपडे, शेतीमाल, खनिज पदार्थ इ. ची निर्यात करीत आहे. स्वातंत्र्यानंतर आणि विशेषता नवीन आर्थिक धोरणानंतर देशाच्या निर्यात रचनेत ही खूप बदल झाल्याचे दिसून येते.

निर्यात रचनेचे विवेचन 

अ.नं.

तपशील

१९७०-७१

१९८०-८१

२०११-११

1

कृषी इतर उत्पादने

४७८(३१.७%)

२०५७ (३०.६%)

१७९३३१ (१२.३%)

2

खनिजे

१६४ (१०.७%)

४१३ (६.२%)

३९०७३(२.७%)

3

उत्पादीत माल

७७२ (५०.३%)

३७४७ (५५.८%)

८९५१२५(६१.३%)

4

पेट्रोलियम उत्पादन व खनिज तेल

१३ (०.८%)

२८ (०.४%)

२६५८१९ (१८.२%)

5

इतर

९९ (६.५%)

४६५ (६.९%)

७९९३३(५.५%)

एकूण

१००%

१००%

१००%

असे दिसून येते की योजना काळात भारताची निर्यात ६०६ कोटी रूपयांवरून (१९६०-६१) १४,५९,२८१ कोटी रूपयापर्यंत (२०११-१२) वाढल्याचे दिसून येते. यामुळे भारताची निर्यात मुल्यात १९९१ नंतर वेगाने वाढल्याचे दिसते. निर्यात रचनेतील बदलीचे विवेचन खालील प्रमाणे करता येईल.

१) कृषी उत्पादने : भारतातून चहा, कॉफी, खाद्य तेल, तंबाखू, साखर इ. वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते यामुळे या वस्तूच्या निर्यातील वाढ झाल्याचे दिसून येते. याशिवाय सूत, सुतीकापड, तांदूळ मासे, फळे, भाजीपाला, मसाल्याचे पदार्थ इ. वस्तूंचे उत्पादन होते. योजना काळात या वस्तूंची निर्यात मुल्यात वेगाने वाढ झाली आहे. परंतु एकूण निर्यातील कृषी मालाच्या हिश्यात ३१% वरून १२% पर्यंत घट झाल्याचे दिसून येते.

२) खनिजे : यामध्ये अभ्रक, लोखंड इत्यादि वस्तूंचा समावेश होतो. भारतातून खनिजांची निर्यात देखील सुरूवातीपासून होत आहे. १९९१ नंतर या वस्तूंची निर्यात ३१ हजार कोटी रूपयांवर गेल्याचे दिसून येते. मात्र खनिजांचे एकूण निर्यात मूल्यातील हिश्यात देखील घट झाल्याचे जाणविते.

३) उत्पादीत माल : भारतामधून तयार कपडे, चामड्याच्या वस्तू, हस्तकलेच्या वस्तू, दागदागिने, रसायने, दुचाकी, स्वयंचलीत मोटारी इ. वस्तूंची निर्यात होते. १९७०-७१ मध्ये एकूण निर्यातीत उत्पादीत मालाचा वाटा जवळ-जवळ ५०% इतका होता. १९५१ नंतरचे खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचे धोरण परकीय भांडवलाचे स्वागत, परवाना पद्धतीतील सुलभता इ. कारणामुळे उत्पादीत वस्तूंचे उत्पादन वाढत गेले व उत्पादीत वस्तूंची निर्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. भारताच्या एकूण निर्यात मुल्यात उत्पादीत मालाच्या हिश्यात ६१% पर्यंत वाढ झाली आहे.

४) पेट्रोलियम व खनिजतेल : भारतातून ऑईल, डांबर इ. वस्तूंचे उत्पादन घेतले जाते. १९९१ नंतर नवीन आर्थिक धोरण स्वीकारले आहे. यामुळे उत्पादनात वाढ होऊन पेट्रोलियम पदार्थांच्या निर्यातीत देखील वाट झाली आहे. देशाच्या एकूण निर्यात मुल्यात पेट्रोलियम व खनिजतेलाचा हिस्सा १८% पर्यंत वाढल्याचे दिसून येते.

५) इतर : भारतातून इलेक्ट्रॉनिक वस्तू व संगणकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. १९९१ नंतर या वस्तूंच्या निर्यातीत देखील वाढ होत असल्याचे दिसून येते.

भारताच्या परकीय व्यापाराची दिशा (Direction of India’s foreign Trade)

विदेशी व्यापराची दिशा म्हणजे इतर देशांबरोबर होणाऱ्या आयात-निर्यातीत नव-नवीन देश आणि बाजारपेठांच्या समावेशाचा अभ्यास होय. म्हणजेच भारताच्या विदेशी व्यापाराच्या दिशामध्ये, विदेशी व्यापार कोणकोणत्या देशाशी चालतो? याचे स्पष्टीकरण हे अभिप्रेत असते. परकीय व्यापाराची दिशा लक्षात घेण्यासाठी जगातील वेगवेगळया देशांचे वर्गीकरण खालील प्रमाणे करता येईल.

१) युरोपीय संघ – यामध्ये फ्रान्स, बेल्जीयम, जर्मनी, नेदरलँड, ब्रिटन इत्यादि देशांचा समावेश होतो.

२) अमेरीकन देश – यामध्ये संयुक्त संस्थाने, कॅनडा इत्यादि देशांचा समावेश होतो.

३) उत्तर आर्थिक सहयोगातील देश – यात ऑस्ट्रेलिया जपान हे देश येतात.

४) पेट्रोलियम निर्यातक देश – यामध्ये इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया इ. देशांचा समावेश होतो.

५) पूर्व युरोप – येथे प्रामुख्याने रूमानिया व इतर पूर्व युरोपीय देशांचा समावेश होतो.

६) दक्षिण आशियाई क्षेत्रीय संघटन देश (सार्क) यामध्ये बांगल देश, भूतान,मालदिव, नेपाळ,पाकिस्तान श्रीलंका, भारत इ. देशांचा समावेश होतो.

७) उत्तर अशियाई विकसनशील देश – येथे हाँगकाँग द. कोरीया सिंगापूर,मलेशिया, थायलंड इत्यादि देशाचा समावेश होतो.

८) आफ्रिका देश – यामध्ये आफ्रिकेतील इजिप्त, केनिया, टांझानिया, सुदान, झांबीया इत्यादि देशांचा समावेश होतो.

भारताच्या आयात-निर्यात व्यापाराची दिशा लक्षात घेताना स्वतंत्र देशांचा उल्लेख न करता सोईसाठी गटवार व्यापाराचा आढावा घ्यावा लागतो. स्वातंत्र्यानंतर देशाच्या आयात-निर्यात व्यापाराची दिशा देखील वेळोवेळी बदलत गेल्याचे दिसून येते.

भारताच्या आयात-निर्यात व्यापाराची दिशा

१९८७-८८

२०११-१२

अ. न.

देश

आयात

निर्यात

आयात

निर्यात

1

युरोपियन युनियन (फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, इंग्लड इटली)

७१२२

(३३.३%)

१०२६६

(२५.१%)

१४५१९८

(११.७%)

१,०२९९३

(१७.२%)

2

अमेरिकन देश (कॅनडा

अमेरीका)

१७७४ (१०.३%)

२३८० (१९.७%)

२५९६५

(५३%)

३६३७०

(११.९%)

3

इतर आर्थिक सहकार्य व विकास (ऑस्ट्रेलिया, जपान स्विर्झलँड)

२७८४

(१६.२%)

१७०८

(१४.१%)

६१९५७

(१२.७%)

१४०८३

(४.६%)

4

पेट्रोलियम निर्यात देश (इराण, इराक सौदी)

२२७७

(१३.३%)

७ ४२

(६०१%)

१७३४४६

(३५.४%)

५७९५५

(१९%)

5

पूर्व युरोपियन देश (रशिया)

१६४०

(९.६%)

२००१

(१.७%)

८५६३

(१.७%)

३२४०

(१.१%)

6

आशियायी देश चीन, हाँगकाँग कोरीया, मलेशिया

२०७७

(१२.१%)

१४४३

(११.९%)

१२६५२२

(२५.८%)

९०१४६

(२९.६%)

7

सार्कप्रणित देश

७५

०.४%

३१२

(२.६%)

२४८७

(०.५%)

१३०८५

४.३%

8

इतर

(स्त्रोत : दत्त सुंदरम्‌-भारतीय अर्थव्यवस्था-जून २०१२)

भारताच्या आयात-निर्यात व्यापाराच्या दिशेन झालेले बदल स्पष्टपणे दिसून येतात. ते खालील प्रमाणे सांगता येतील.

१) सन १९८७-८८ भारताचा युरोपियन बरोबरचा परकीय व्यापार (आयात-निर्यात) अनुक्रमे ३३.३% व २५.१% असा होता. १९९१ च्या नविन आर्थिक धोरणानंतर युरोपियन युनियने बरोबरचा परकीय व्यापार घटल्याचे दिूसन येते. सन २०११-१२ च्या आकडेवारीनुसार आयात ११.७% व निर्यात १७.२% पर्यंत घटली असल्याचे दिसून येते.

२) सन १९९११ पूर्वी भारताचा अमेरिकन देशाबरोबरचा आयात-निर्यात व्यापार अनुक्रमे १०.३% व १९.७% असा होता. नंतरच्या काळात अमेरीकेबरोबरचा परकीय व्यापार २०११-१२ मध्ये ५.३% व ११.९% पर्यंत घटल्याचे दिसून येते.

३) १९९१ पूर्वी आर्थिक सहकार्य व विकास संघातील ऑस्ट्रोलिया, जपान, स्विर्झलंड इ. देशाबरोबरचा आयात निर्यात व्यापार देखील घटला आहे. भारताची या देशाकडील निर्यात १४% वरून ५% खालीपर्यंत घटल्याचे दिसून येते.

४) नवीन आर्थिक धोरणाच्या पूर्वी भारत पेट्रोलियम तेल उत्पादक देशाकडून आयात करीत असे  सन २०११-१२ पर्यंत या देशाकडील आयातीत जवळ जवळ पावणेतीन पट झाली आहे. मात्र त्यांचे कडील निर्यातीत तुलनेने कमी वाढ झाली आहे.

५)१९९१ नंतर भारताचा पूर्व युरोपियन राष्ट्रे विशेषत: रशिया बरोबरचा आयात-निर्यात व्यापार देखील लक्षणीय प्रमाणात घठल्याचे जाणविते.

६) नवीन आर्थिक धोरणानंतर चीन, हाँगकाँग, कोरीया, मलेशिया आशियन देशाबरोबरचा परकीय व्यापार दुपटीने वाढला आहे.

७) १९९१ पासून भारताचा सार्क प्रणित देशाबरोबरचा आयात-निर्यात व्यापार देखील खूप वाढल्याचे दिसून येते.

भारताचे परकीय व्यापार धोरण

नवीन २००९-२०१४ च्या अयात-निर्यात धोरणाचे विवेचन पुढील प्रमाणे करता येईल.

१) बाजारपेठ व उत्पादन विविधीकरणासाठी मदत :

नवीन योजने अंतर्गत बाजारपेठा व नवीन उत्पादनाचे विस्तृतीकरण करून २६ बाजारपेठांची निर्मिती करण्यात आली. याशिवाय बाजारपेठेवर आधारित उत्पादने करण्याचे धोरण ठेवले आहे.

२) तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण :

या योजनेखाली निर्यात वृद्धीसाठी निर्यात क्षेत्राचे आधुनिकीकरण योजना शुन्य करासह सुरू केली. हस्त व्यवसायासाठी जयपूर, श्रीनगर व अनंतनाग इ. शहरांना ‘उच्च निर्यात शहरे’ म्हणून मान्यता दिली.

३) हरित उत्पादने व नैऋत्येकडील उत्पादनाना साहाय्य :

निर्यात प्रोत्साहन योजनेचा भाग म्हणून फोकस प्रॉडक्ट स्कीमचे फायदे हरित उत्पादनाच्या निर्यातीसाठी वाढविण्यात आले व नैऋत्येकडील उत्पादनामध्ये देखील वाढविण्यात आले.

४) मौल्यवान दागिने विषयी सवलती :

नवीन योजनेखाली सोन्याच्या दागिन्यांची निर्यात वाढावी याकरीता त्यांना करातून सूर देण्यात आली. मौल्यवान दागिने व मौल्यवान खडे परदेशात प्रदर्शनासाठी न्यावयाचे असतील तर त्यासाठी २० लक्ष ऐवजी ५० लक्ष अमेरिकन डॉलर्स ऐवढ्या किंमतीच्या वस्तूत मान्यता देण्यात आली.

५) कृषीमाल :

नाशवंत कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी एक खिडकी पद्धत सुरू करण्यात आली. यामूधन जलद व तत्पर सेवा देण्यात येत आहेत.

६) चर्मोद्योग क्षेत्र :

नवीन योजनेखाली चर्मोद्योग क्षेत्रातील चामड्यांची पुर्ननिर्यात करण्यास परवानगी देण्यात आली.

७) चहा :

या योजनेखाली चहाच्या निर्यातीसाठी आगावू अधिकार योजने अंतर्गत असलेली १००% व्हॅल्यू ॲडीशन ५०% पर्यंत खाली आणण्यात आली. तसेच इंन्स्टंट चहाची विक्रीमर्यादा ३०% वरून ५०% वर करण्यात आली.

८) हातमाग निर्यात :

नवीन निर्याते धोरणात हातमाग उद्योगातील उत्पादनाची निर्यात वाढावी यासाठी पूर्वी हातमाग वस्तूवर अनिवार्य असणाऱ्या शिक्का मारणे रद्द करण्यात आला. यामुळे निर्यात वाढीस चालना मिळण्यास मदत झाली.

९) निर्यात प्रधान उत्पादन :

नवीन निर्यात धोरणाअंतर्गत भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू करीता निर्यात प्रधान उद्योगाना ७५% ऐवजी ९०% पर्यंत वस्तूंची निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली.

१०) निर्यातदारासाठी लवचिकता :

निर्यातदारांना जो कर भरावा लागतो, त्या कराची रक्कम व खासगी विमा कंपण्यानी मान्य केलेल्या ट्रान्झिट लॉस दाव्याना परपूर्तीची परवानगी देण्यात आली.

११) प्रक्रिया सुलभीकरण

१. या योजनेखाली निर्यात वस्तूंची आयात करणे सुलभ व्हावे १५ निर्यात वस्तू वरून ५० पर्यंत वस्तूची यादी वाढविली.

२. मध्यस्त उत्पादकाकडून आगावू परवानगी घेतलेल्या धारकाला जकातीतून दोन स्तरापर्यंत सुट देऊ केली.

३. निर्यात करणाऱ्या कंपन्यांचा वहातूक खर्च कमी करण्यासाठी आगावू परवानगी घेतलेल्या आयात वस्तूंची बंदरातून कमी खर्चात पाठवणी करणे.

४. निर्यात कर भरल्यानंतर निर्यातीची बंधनकारक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी उत्पादीत वस्तूतील भंगार माल काढून टाकण्याची परवानगी देण्यात आली.

५. देशातील प्रमुख ने बाज वापरीत असलेल्या विदेशी वस्तूच्या आयातीस क्रिडा खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तत्काळ परवानगी देऊ केली.

६. व्यापार व उद्योगांच्या मागणीच्या पूर्ततेसाठी निर्यात उत्तेजन हमी येाजने अंतर्गत विनंती व रिडेम्पशन अर्ज सुलभ करणेत आले.