भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम

एकात्मिक मार्गदर्शीत क्षेपणास्त्र विकास (Integrated Guided Missile Development Programme- IGMDP) हा भारतीय लष्काराचा प्रकल्प असून संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते.  भारताने विकसित केलेल्या क्षेपणास्त्रांचा आढावा याठिकाणी केलेला आहे.

पृथ्वी 

पृथ्वी-I

सरकारच्या IGMDP कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी-1 हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र आहे.

 • १९८८ साली या क्षेपणास्त्राची सर्वप्रथम चाचणी करण्यात आली.
 • हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे.
 • सिंगल स्टेज द्रव इंधन.
 • पल्ला: १५० किमी.
 • वजन: ४४०० किलो.
 • १९९४ साली लष्करात दाखल करण्यात आले.

पृथ्वी-II

हे क्षेपणास्त्र पृथ्वी-१ ची वायुसेनेसाठी असलेली आवृत्ती आहे.

 • १९९६ साली या क्षेपणास्त्राची सर्वप्रथम चाचणी करण्यात आली.
 • सिंगल स्टेज द्रव इंधन.
 • पल्ला: २५० किमी.
 • वजन: ४६०० किलो.

पृथ्वी-III

हे क्षेपणास्त्र पृथ्वी-१ ची नौसेनेसाठी असलेली आवृत्ती आहे.

 • २००० साली या क्षेपणास्त्राची सर्वप्रथम चाचणी करण्यात आली.
 • हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे.
 • टू स्टेज सॉलिड+लिक्विड इंधन
 • पल्ला: ३५० किमी.
 • वजन: ५६०० किलो.
 • २००४ साली लष्करात दाखल करण्यात आले.

अग्नि 

अग्नि -1

 • १९८९ साली या क्षेपणास्त्राची सर्वप्रथम चाचणी करण्यात आली.
 • हे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र आहे.
 • सिंगल स्टेज सॉलिड फ्युएल
 • पल्ला: 700 किमी.
 • वजन: 12 टन
 • लांबी: १५ मीटर

अग्नि -२

 • पल्ला: २०00 किमी.
 • टू अँड हाल्फ स्टेज सॉलिड फ्युएल
 • वजन: 1८ टन
 • लांबी: २० मीटर

अग्नि -३

 • ९ जुलै २००६ रोजी या क्षेपणास्त्राची सर्वप्रथम चाचणी करण्यात आली.
 • हे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र आहे.
 • टू स्टेज सॉलिड फ्युएल
 • पल्ला: ३५०० किमी.
 • वजन: ४८ टन
 • लांबी: १७ मीटर

अग्नि -४

 • १५ नोव्हेंबर २०११ रोजी या क्षेपणास्त्राची सर्वप्रथम चाचणी करण्यात आली.
 • टू स्टेज सॉलिड फ्युएल
 • हे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र आहे.
 • पल्ला: ३५०० किमी.
 • वजन: १७ टन
 • लांबी: २० मीटर

अग्नि -५

 • आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र.
 • १९ एप्रिल २०१२ रोजी या क्षेपणास्त्राची सर्वप्रथम चाचणी करण्यात आली.
 • हे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र आहे.
 • थ्री स्टेज सॉलिड फ्युएल
 • पल्ला: ५५०० किमी.
 • वजन: ४९ टन
 • लांबी: १७.५ मीटर

त्रिशुल 

 • कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र.
 • जमिनीवरून हवेत मारा
 • पल्ला: ९ किमी.
 • वजन: १३० किलो
 • लांबी: ३.१ मीटर

धनुष 

 • भारतीय नौसेनेने विकसित केलेले क्षेपणास्त्र.
 • जमिनीवरून जमिनीवर मारा.
 • हे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र आहे.
 • ५ ऑक्टोबर २०१२ रोजी या क्षेपणास्त्राची सर्वप्रथम चाचणी करण्यात आली.
 • पल्ला: ३५० किमी.
 • वजन: ४५०० किलो
 • लांबी: ८.५३ मीटर

आकाश 

 • मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र.
 • जमिनीवरून हवेत मारा करणारे.
 • राजेंद्र रडारचा वापर.
 • पल्ला: ३० किमी.
 • वजन: ७२० किलो
 • लांबी: ५.७८ मीटर

नाग 

 • फायर अँड फॉरगेट प्रकारचे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र.
 • HeliNa (Helicopter-launched Nag)- हेलिकॉप्टरमधून मारा करणारी नाग क्षेपणास्त्राची आवृत्ती.
 • २०१० मध्ये  या क्षेपणास्त्राची सर्वप्रथम चाचणी करण्यात आली.
 • पल्ला: ७-१० किमी.
 • वजन: ४२ किलो
 • लांबी: १.९० मीटर

निर्भय 

 • दूर पल्ल्याचे क्षेपणास्त्र.
 • सबसोनिक क्रूझ मिसाईल.
 • पल्ला: १०००-१५०० किमी.
 • वजन: १५०० किलो
 • लांबी: ६ मीटर

प्रहार 

 • कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र.
 • पृथ्वी-१ ची जागा घेणार.
 • जमिनीवरून जमिनीवर मारा.
 • टॅक्टिकल बॅलेस्टिक मिसाईल
 • कोणत्याही दिशेने मारा करू शकणारे.
 • प्रगती: निर्यातीसाठी बनवलेली प्रहार या क्षेपणास्त्राची आवृत्ती. (पल्ला: १७० किमी)
 • पल्ला: १५० किमी.
 • वजन: १२८० किलो
 • लांबी: ७.३ मीटर

शौर्य 

 • हायपरसोनिक प्रकारचे क्षेपणास्त्र.
 • वेग: ७.५ मॅक
 • जमिनीवरून जमिनीवर मारा.
 • हे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र आहे.
 • पल्ला: ७०० किमी.
 • वजन: ६२०० किलो
 • लांबी: १० मीटर

सागरिका (K-१५)

 • पाणबुडीतून मारा करणारे.
 • हे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र आहे.
 • पल्ला: ७५० किमी.
 • वजन: ६ ते ७ टन
 • लांबी: १० मीटर

सूर्य 

 • आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र.
 • अद्याप विकसित नाही.
 • अतिशय गोपनीय प्रकल्प असल्याने याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
 • पल्ला: १२००० ते १६००० (चर्चित)

ब्रह्मोस 

 • रशियाच्या NPO Mashinostroeyenia आणि भारताच्या DRDO  ने संयुक्तपणे स्थापन केलेल्या BrahMos Aerospace कडून विकसित.
 • भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मस्कवा नद्यांच्या नावावरून ब्राह्मोस हे नाव.
 • मध्यम पल्ल्याचे.
 • सुपरसोनिक क्रूझ मिसाईल.
 • वेग: २.८ ते ३ मॅक.
 • कार्यरत असणारे जगातील सर्वात वेगवान नौकाविरोधी क्रूझ मिसाईल.
 • पल्ला: ४५० किमी.
 • वजन: ३ टन
 • लांबी: ८.४ मीटर