भाऊ महाजन

जन्म व शिक्षण 
  • भाऊ महाजन (१८१५-१८९०) हे मराठी पत्रकार होते. त्यांचे मुळ नाव गोविंद विठ्ठल कुंटे असे होते. त्यांचा जन्म रायगड जिल्हातील पेण येथे झाला. 
  • १८२२ च्या सुमारास ते मुंबईला आले आणि तेथे सदाशिव काशीनाथ ऊर्फ बापू छत्रे ह्यांच्याकडे राहुन त्यांनी शिक्षण घेतले. मुंबईच्या एल्‌फिन्स्टन विद्यालयात त्यांनी अध्ययन व अध्यापन केले. इंग्रजी, संस्कृत व फार्सी ह्या भाषांचा त्यांचा चांगला अभ्यास होता.
भाऊ महाजन यांची पत्रकारिता
  • शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८४१ मध्ये त्यांनी प्रभाकर हे साप्ताहिक पत्र काढले.
  • बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं ‘दर्पण’ हे द्वैभाषिक नियतकालिक होतं. त्यातील इंग्रजी मजकुराचं संपादन स्वत: जांभेकर करत, तर मराठी विभाग भाऊ महाजन पाहत असत.
  • लोकहितवादींच्या शतपत्रांना त्यांनीच प्रभाकरातून निर्भयपणे प्रसिद्धी दिली. इंग्रजांच्या राज्यपद्धतीवरही ह्याच पत्राने प्रथम टीका केली.
  • १८५३ मध्ये त्यांनी धूमकेतू हे साप्ताहिक काढले.
  • पाश्चात्य विद्यांचा परिचय लोकांना करून देण्यासाठी ज्ञानदर्शन नावाचे एक त्रैमासिकही त्यांनी १८५४ मध्ये काढले होते. त्याच्या ऑक्टोबर, १८५४ च्या अंकात एका कादंबरीचे पहिले प्रकरण प्रसिद्ध झाले होते. ही कादंबरी भाऊंनी लिहायला घेतली होती. तिचं नाव- ‘परागंदा जाहालेल्या गृहस्थाची कन्या’. परंतु पुढे १८५६ मध्ये तेही बंद पडले आणि कादंबरीचे लेखनही. ती पूर्ण झाली असती तर मराठीतील पहिली कादंबरी ठरू शकली असती.
  • त्यांनी स्वतंत्र ग्रंथनिर्मित केल्याचे दिसत नाही; तथापि विनायकशास्त्री दिवेकर ह्यांच्या शब्दसिद्धिनिबंध (१८४३) ह्या ग्रंथाच्या लेखनात त्यांनी सहाय्य केले होते.