बेटी बचाओ बेटी पढाओ

बेटी बचाओ बेटी पढाओ-पार्श्वभूमी

बेटी बचाओ बेटी पढाओ लोगो

१९६१ च्या जनगणनेपासून भारतातील बाल लिंग गुणोत्तर घटत आहे. १९९१ साली ९४५ इतके असणारे ० ते ६ वयोगटातील लिंग गुणोत्तर २००१ साली ९२७ इतके झाले. तर २०११ साली हेच गुणोत्तर ९१८ इतके झाले. ० ते ५ या वयोगटातील घसरत्या लिंग-गुणोत्तराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना ऑक्टोबर २०१४ मध्ये घोषित केली. २२ जानेवारी २०१५ रोजी या योजनेचा प्रारंभ पानिपत (हरियाना) येथून करण्यात आला. ही योजना महिला व बालकल्याण मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि मानव संसाधन विकास मंत्रालय या तीन केंद्रीय मंत्रालयांचा संयुक्त उपक्रम आहे.

ध्येय व उद्दिष्ट

ध्येय

मुलीच्या जन्माचे स्वागत करणे व तिच्या शिक्षणाची सुनिश्चिती करणे.

उद्दिष्टे

 1. लिंगाधारित भेदभाव नष्ट करुन मुलींचा जन्म व संरक्षण याची सुनिश्चिती करणे.
 2. स्त्री ब्रून हत्या रोखणे.
 3. मुलींना शिक्षित करणे.

योजनेसाठी निवडलेले जिल्हे

पहिला टप्पा

पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय बाल लिंग गुणोत्तरापेक्षा कमी बाल लिंग गुणोत्तर असणाऱ्या १०० जिल्ह्यांची निवड या योजनेसाठी प्रायोगिक तत्वावर करण्यात आली.

दुसरा टप्पा

दुसऱ्या टप्प्यात ९१८ पेक्षा कमी बाल लिंग गुणोत्तर असणाऱ्या ६१ जिल्ह्यांचा समावेश या योजनेत केला गेला.

योजनेचे घटक

 • लिंग समानतेवर भर देण्यासाठी शाळेच्या अभ्यासक्रमात लिंग समानता या धड्याचा समावेश केला जाईल.

या योजनेत पुढील महत्वाची कार्ये हाती घेतली जातील-

 1. शाळा व्यवस्थापन समित्यांना मुलींच्या सार्वञिक शाळानोंदणीसाठी उद्युक्त करणे.
 2. शाळेत बालिका मंचाची स्थापना करणे.
 3. शाळेत मुलींसाठी स्वतंञ स्वच्छतागृहांची सोय करणे.
 4. अकार्यरत स्वच्छतागृह कार्यरत करणे.
 5. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांचे काम पुर्ण करणे.
 6. उच्च प्राथमिक स्तरावर शाळाबाह्य मुलींची पुर्ननोंदणी करणे.
 7. उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील मुलींसाठी वसतीगृहांची उभारणी करणे.

संदर्भ:

 1. विकासपेडीया 
 2. विकीपेडिया