बालमृत्यू दर
दर १००० जीवित जन्मांमागे पाच वर्षांच्या आत मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या म्हणजेच बालमृत्यू दर होय
सहस्रक विकास उद्दिष्टानुसार (MDG) बालमृत्यूदर ४२ असणे अपेक्षित होते.
जगामध्ये सर्वाधिक बालमृत्यू दर असणारे देश १) भारत २०% २) नायजेरिया ३) पाकिस्तान ४) काँगो ५) इथिओपिया
सर्वाधिक बालमृत्यू दर असणारे राज्य १) आसाम (७३) २) मध्यप्रदेश (६९)
१००० जीवित जन्मामागे २८ दिवसांच्या आत मृत्यू पावलेल्या बालकांची संख्या म्हणजे नवजात मृत्युदर (Neonatal mortality rate) होय.
बाराव्या पंचवार्षिक योजनेत नवजात मृत्युदर १८ करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.
जगातील सर्वात जास्त नवजात मृत्यू (३३ टक्के) भारतात होतात .
सर्वाधिक नवजात मृत्यूदर असणारी राज्ये १) ओरिसा( ३७) २) मध्य प्रदेश(३६)
सर्वात कमी नवजात मृत्युदर असणारे राज्य केरळ(६)
अर्भक मृत्यू
दर १००० जीवित जन्मामागे एका वर्षाच्या आत मृत्यू पावलेल्या बालकांची संख्या म्हणजे अर्भक मृत्यूदर होय.
बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी अर्भक मृत्यू दर पंचवीस करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
भारताने अर्भक मृत्यू दरामध्ये १९९० सालच्या तुलनेत ५३ टक्के घट घडवून आणली आहे.
सहस्रक विकास उद्दिष्टानुसार (MDG) अर्भक मृत्यूदर २७ असणे अपेक्षित आहे
सर्वात जास्त अर्भक मृत्यूदर १) मध्य प्रदेश(४७) २) आसाम (४४) ३) उत्तर प्रदेश (४३)
सर्वात कमी अर्भक मृत्यू दर १) गोवा (८) २) केरळ (१०) ३) मणीपूर (११)