बलवंतराय मेहता समिती
बलवंतराय मेहता समिती
स्थापना- १६ जानेवारी १९५७
अहवाल- २४ नोव्हेंबर १९५७
सदस्य-
- बी. जी. राव
- डी. पी. सिंग
- ठाकूर फुलसिंग
शिफारसी लागू- १९५८
महत्वाच्या शिफारसी-
- संपुर्ण देशासाठी ञिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करण्यात यावी.
- जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा.
- ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेपेक्षा पंचायत समितीला अधिक महत्व दिले जावे.
- प्रत्यक्ष प्राैढ मतदानाद्वारे गाव पातळीवरील ग्रामपंचायतींचे गठन केले जावे.
- न्यायपंचायतींची स्थापना करण्यात यावी.
- जिल्हापरिषदेत सदस्य म्हणून आमदार व खासदार यांना सदस्यत्व द्यावे.
- पंचायत राजमध्ये सहकार चळवळीचा समावेश करण्यात यावा.
- राज्य शासनाने केवळ नियंञण, मार्गदर्शन व योजनेचे कार्य करावे.
- गाव स्तरावर ग्रामपंचायत, तालुका स्तरावर पंचायत समिती व जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद अशी ञिस्तरीय यंञणा असावी.
- ग्रामपंचायतीचा विकास सचिव ग्रामसेवक असावा.
- ग्रामपंचायतीच्या कार्यात पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रकाशव्यवस्था आणि मागास जातींचे कल्याण यांचा समावेश करण्यात यावा.
- ग्रामपंचायतीला आपल्या समस्या सोडविण्यासाठी संपत्ती कर, बाजार कर व अनुदान इ. उत्पन्नाची साधने असावीत.