प्राण्यांचे वर्गीकरण (Classification Of Animals)

प्राण्यांचे वर्गीकरण (Classification Of Animals) पुढील दहा प्रकारात केले जाते.

अ. क्र. संघ उदाहरणे
पोरिफेरा सायकाॅन, स्पाॅंजिला
सिलेंटेराटा हायड्रा, सी-अॅनिमोन, फायझेलिया
प्लॅटिहेल्मिंथिस टेपवर्म, प्लॅनेरिया, लिव्हरफ्लूक
निमॅटहेल्मिंथिस अॅस्कॅरिस, वुचेरेरिया
अॅनिलिडा गांडूल, लीच, नेरीस
आॅर्थ्रोपोडा मधमाशी, माशी, कोळंबी, विंचू
मोलुस्का शंख, शिंपला, अष्टपाद, गोगलगाय,
इकायनोडर्माटा तारमासा, सी-अर्चिन
हेमिकाॅर्डाटा बॅलॅनोग्लाॅसस
१० काॅर्डाटा सायक्लोस्टोमाटा, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी व सस्तन प्राणी

१) पोरिफेरा (Poriphera)

 • गोड्या, खार्या आणि दोन्ही पाण्यात राहू शकणारे सजीव.
 • या प्रकारातील प्राण्यांच्या शरीरावर छिद्रे असतात, त्या छिद्रांना ‘आॅस्टिया’ म्हणतात. मोठ्या छिद्रांना ‘आॅस्क्युलम’ असे म्हणतात.
 • आॅस्टिया हे मुखाचे काम करतात तर आॅस्क्युलम गुदद्वाराचे काम करतात.
 • शरीरावर कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले एक शुकिकांचे आवरण असते.
 • हे सजीव अमोनिया पदार्थ उत्सर्जित करतात.
 • पोरिफेरा हे प्राणी आहेत असे ‘एलिझ’ या शास्ञज्ञाने सांगितले तर पोरिफेरा ही संज्ञा ‘ग्रॅंट’ यांनी दिली.

२) सिलेंटेराटा/निडारीया (Cnidaria)

 • जास्तीत जास्त समुद्रात आढळणारे प्राणी.
 • अरीय सममित असणारे (Radial symmetry) प्राणी ज्यांच्यामध्ये प्रजनन मुकुलायन (Budding) पद्धतीने होते.
 • चार प्रकारात विभाजन- हायड्रोझोआ, स्कॅपोझोआ, क्युबोझोआ, अॅन्थोझोआ.
 • सिलेंटेराटा हे नाव ‘ल्यूकार्ट’ यांनी दिले.

३) प्लॅटिहेल्मिंथिस (Platihelminthis)

 • शरीर चपटे, ञिस्तरीय (Three layers) व द्विपार्श्व सममित असते.
 • यांना मेंदू असतो परंतु रक्ताभिसरण संस्था नसते.
 • बहुतेक प्राणी अंतःपरजीवी (Parasitic) असतात.
 • तीन प्रकारात विभाजन- टर्बेलॅरिया, ट्रिमॅटोडा, सियास्टोडा.

४) निमॅटहेल्मिंथिस (Nemathelminthis)

 • शरीर लांबट, दंडाकृती, ञिस्तरीय व द्विपार्श्व सममित असते.
 • यांच्यात पेशीची संख्या जन्मापसून मरेपर्यंत सारखीच असतात.
 • बहुतेक प्राणी अंतःपरजीवी (Parasitic) असून एकलिंगी (Unisexual) असतात.
 • मानवी रोग पसरवतात व त्यांना राउंड वर्मस असेही म्हणतात.
अ. क्र.  प्राणी अवयव रोग
अॅस्कॅरिस पोट/आतडे अॅस्कॅरिअॅसीस
पीनवर्म पोट/आतडे उलट्या
 फायलेरिया त्वचा हत्तीपाय
हुक वर्म पोट पोटदुखी

५) अॅनिलिडा (Anilida)

 • शरीर लांबट, दंडाकृती, ञिस्तरीय, खंडीभूत व द्विपार्श्व सममित असते.
 • साधारणपणे उभयलिंगी व उभयचरी प्राणी असतात.
 • रक्ताभिरसण संस्था असते पण RBC नसतात.
 • तीन गटांत विभाजन- पाॅलीकायटा, आॅलिगिकायटा, हिरूडिनिया
 • अॅनिलिडा ही संज्ञा ‘लॅमार्क’ यांनी दिली.

६) आर्थोपोडा (Arthropoda)

 • Animal with Jointed Legs.
 • प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ (८० टक्के)
 • सार्वञिक आढळणारे, ञिस्तरीय व द्विपार्श्व  सममित सजीव.
 • एकलिंगी असूनही लैंगिक प्रजनन करतात.
 • आर्थोपोडा हे नाव व्हाॅन ‘सायबोल्ड’ यांनी दिले.
 • चार गटात विभाजन- आॅनिकोफोरा, ट्रिलोबीटा, केलीकेराटा, मॅन्डिब्युलाटा.

७) मोलुस्का (Moluska)

 • शरीर ञिस्तरीय व द्विपार्श्व सममित असून साधारणपणे पाण्यात निवास करतात.
 • प्राणीसृष्टीतील दुसरा सर्वात मोठा संघ.
 • मोलुस्का ही संज्ञा ‘जाॅहनस्टाेन’ यांनी दिली.
 • मोलुस्काच्या अभ्यासाला मॅलॅकाॅलाॅजी असे म्हणतात.
 • सहा गटात विभाजन- मोनोप्लॅकोफोरा, अॅम्फिम्युरा/पाॅलिप्लॅकोफोरा, गॅस्ट्रोपोडा, पेलेसायपोडा/बायव्हॅल्व्हीया, स्कॅपोफोडा, सिफॅलोपोडा.

८) इकायनोडर्माटा (Echinodermata)

 • शरीर ञिस्तरीय, अरीय सममित अखंडित असून हे प्राणी कॅल्शियम कार्बोनेटच्या काटेरी कवचांनी बनलेले आहेत.
 • सागरी पाण्यात राहतात.
 • एकलिंगी असून यांच्यामध्ये उत्सर्जन संस्था नसते.
 • पाच गटांत विभाजन- अॅस्टिरोडी, आॅफियुरोडी, इकायनोडी, होलोथुरोडी, क्रिनाॅइडी

९)हेमिकाॅर्डाटा (Hemichordata)

 • शरीर ञिस्तरीय, द्विपार्श्व सममित, अखंडित, मृदू असून यांना पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांमधील दुवा असे म्हणतात.
 • यांचे अस्तित्व समुद्रामध्ये आढळते. बिळे करून राहणारा प्राणी.
 • श्वसनासाठी कल्ले असून ते लैंगिक प्रजनन करतात.

१०) काॅर्डाटा (Chordata)

 • शरीर, मान, धड व शेपूट अशी शरीर रचना असते.
 • सर्व प्राण्यांना पृष्ठारज्जू (Notocord) असतो.
 • बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था, श्वसनासाठी कल्लेविदरे किंवा फुप्फुसे, कंठग्रंथी तसेच अधर बाजूस (Ventral side) असलेले हृदय हे यांचे वैशिष्ट्य आहे.
 • तीन गटात विभाजन- सिफॅलोकाॅर्डाटा, युरोकाॅर्डाटा/ट्युनिकाटा, व्हर्टीब्राटा/क्रॅनिएटा

काही महत्वाचे वर्ग-

१. मत्स्यवर्ग ( पायसेस/pyces )

 • गोड्या व खार्या पाण्यातील माशांचा समावेश.
 • श्वसनासाठी कल्ले, पोहण्यासाठी पर व दिशा बदलण्यासाठी शेपूट असते.
 • यांना दोन कप्प्यांचे हृदय व एकेरी रक्ताभिसरण संस्था असते.
 • अंडज व शीत रक्ताचे प्राणी (वातावरणानुसार यांचे तापमान बदलते)
 • मत्स्यवर्ग अभ्यासाला इकथिआेलाॅजी असे म्हणतात.
 • पाण्याची कंपने आेळखण्यासाठी यांच्यात र्हिरोरिसेप्टर असतात.
 • उदा. इलेक्ट्रीक रे, स्टींग रे, पापलेट इ

२. उभयचर वर्ग (अॅम्फिबिया/ Amphibiya)

 • पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतात.
 • अंगावर श्लेष्मल ग्रंथी असल्यामुळे हे प्राणी कायम आेलसर असतात.
 • तीन कप्प्यांचे हृदय असून शुद्ध व अशुद्ध रक्त एकञ मिसळले जाते.
 • अंडज प्राणी असून फक्त गोड्या पाण्यात आढळतात.
 • या वर्गामध्ये एस्टिवेशन (Summer sleep) व हायबरनेशन (Winter Sleep) हे वैशिष्ट्य आढळते.
 • उदा. सॅलेमंडर, सायरेन, हायला, रानाटायगरीयाना इ.

३. सरिसृप (रेप्टीलिया/Reptile )

 • साधारणपणे हे प्राणी जमिनीवर वास्तव्य करतात.
 • त्वचा आोबडधोबड, शुष्क व खवलेयुक्त असतात.
 • यांना पाय खूप आखूड असतात (कासव, पाल, सरडा) किंवा नसतातही (धामण, अजगर, साप, नाग)
 • तीन कप्प्यांचे हृदय असते. अपवाद- मगर (चार कप्प्यांचे हृदय)
 • हे प्राणी एकलिंगी व अंडज असून शरीरांतर्गत फलन होते.
 • उदा. क्रोकोडाईल, अॅलिगेटर इ.

४. पक्षीवर्ग ( एव्हज् /Aves )

 • उष्ण रक्ताचे म्हणजेच होमिआेथर्मिक/एन्डोथर्मिक,  एकलिंगी व अंडज प्राणी.
 • चार कप्प्याचे हृदय असून फुप्फुसाद्वारे श्वसनक्रिया होते.
 • त्याच्या त्वचेवर पिसांची निगा राखणार्या प्रीन ग्रंथी असतात.
 • पक्ष्यांमधील ध्वनीयंञाला सिरिंक्स असे म्हणतात.
 • उदा. पोपट, घार, घुबड, मोर इ.

५. सस्तनी वर्ग (मॅमलिया/Mammilia )

 • प्रामुख्याने भूचर प्राणी.
 • उष्ण रक्ताचे, एकलिंगी व जरायुज प्राणी.
 • प्लॅटिपस व एकिडना हे अपवाद असून ते अंडज प्राणी आहेत.
 • चार कप्प्याचे हृदय असते.
 • घाम ग्रंथी, स्तन ग्रंथी व मेद ग्रंथी असतात.
 • उदा. गाय, म्हैस, शेळी, हत्ती इ

 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: