प्रयोग

वाक्य म्हणजे पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह होय. वाक्यातील सर्वात महत्वाचा शब्द म्हणजे क्रियापद होय. तसे पाहता कर्ता- कर्म-क्रियापद हे तीनही घटक महत्वाचे आहेत. वाक्यातील कर्ता- कर्म-क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन व पुरूष याप्रमाणे बदलते की नाही यावरून प्रयोगाचे मुख्य प्रकार ३ आहेत.

 1. कर्तरिप्रयोग
 2. कर्मणिप्रयोग
 3. भावेप्रयोग

 

१. कर्तरीप्रयोग

वाक्यातील क्रियापद जेंव्हा त्यातील कर्त्याच्या लिंग, वचन व पुरूष यानुसार बदलते, म्हणजेच क्रियापद हे कर्त्याच्या तंञाप्रमाणे चालते, तेंव्हा ते वाक्य कर्तरी प्रयोगात असते. उदा.  ती अभ्यास करते.

या वाक्यात ती हा कर्ता आहे, अभ्यास हे कर्म आहे व करते हे क्रियापद आहे.

या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी ‘करते’ हे क्रियापद कोणाप्रमाणे बदलते, हे पाहणे आवश्यक आहे. ते कर्त्याप्रमाणे बदलते की कर्माप्रमाणे बदलते हे लक्षात घ्यावे लागेल. त्यासाठी क्रमाने कर्त्याचे लिंग, वचन व पुरूष बदलून पाहू. असा बदल करताना एका वेळी एकाच प्रकारचा बदल करणे आवश्यक आहे.

 • तो अभ्यास करतो.
 • ते अभ्यास करतात.
 • तू अभ्यास करतोस.

याचा अर्थ असा की, ती अभ्यास करते या वाक्यातील क्रियापद कर्त्याचे लिंग, वचन व पुरूष याप्रमाणे बदलले आहे. म्हणजे येथे क्रियापद हे कर्त्याच्या तंञाप्रमाणे चालते. म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे.

कर्तरिप्रयोगात क्रियापद सकर्मक असले, तर त्यास सकर्मक कर्तरिप्रयोग असे म्हणतात व क्रियापद अकर्मक असल्यास त्यास अकर्मक कर्तरिप्रयोग म्हणतात. उदा.

 • ती गाणे गाते(सकर्मक कर्तरिप्रयोग)
 • तो घरी जातो(अकर्मक कर्तरिप्रयोग)

सकर्मक व अकर्मक वाक्यांतील फरक कसा ओळखावा?

सकर्मक वाक्यअकर्मक वाक्य
क्रिया करणारा एक व ती सोसणारा दुसराच असतो.क्रिया करणारा व सोसणारा तोच असतो.
१.घार(घारीने) साप पकडते.(पकडला)१.दादा कोल्हापूरला गेला.
२.मीना(मीनाने) जेवन करते.(केले)२.बाळ दुडदुडू चालत होते.
३.राम चिञ काढतो.३.नर्मदा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.
४.बाळ्याने झाडाचा पेरू तोडला.४.पक्षी आकाशात उडतात.

कर्तरि प्रयोगाची लक्षणे

कर्तरिप्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमान्तच असतो व कर्म हे नेहमी प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते. उदा.

 1. मी बाहेरून आताच घरी आलो. (कर्ता मी प्रथमान्त)
 2. मुलगा कादंबरी वाचतो. (कर्म कादंबरी प्रथमान्त)
 3. मांजरीने उंदरास पकडले.(कर्म चोरास द्वितीयान्त)

२.कर्मणिप्रयोग

वाक्यातील क्रियापद जेंव्हा त्यातील कर्माच्या लिंग, वचन व पुरूष यानुसार बदलते, म्हणजेच क्रियापद हे कर्माच्या तंञाप्रमाणे चालते, तेंव्हा ते वाक्य कर्मणिप्रयोगात असते. उदा. राजाने राजवाडा बांधला.

या वाक्यात राजाने हा कर्ता आहे, राजवाडा हे कर्म आहे व बांधला हे क्रियापद आहे.

या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी बांधला हे क्रियापद कर्त्याप्रमाणे बदलते की कर्माप्रमाणे बदलते हे लक्षात घ्यावे लागेल. त्यासाठी क्रमाने कर्त्याचे लिंग, वचन व पुरूष बदलून पाहू. असा बदल करताना एका वेळी एकाच प्रकारचा बदल करणे आवश्यक आहे.

 • राणीने राजवाडा बांधला.
 • मंञ्याने राजवाडा बांधला.

वरीलप्रमाणे कर्त्याच्या लिंग, वचनामद्ये बदल करूनही क्रियापदाचे रूप बांधला या रुपामध्ये बदल होत नाही. म्हणजे कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही, म्हणून हा कर्तरिप्रयोग नाही.

आता कर्माचे लिंग बदलून पाहू. राजवाडा ऐवजी विहीर हे स्ञीलिंगी कर्म घेतले तर क्रियापदाचे रूप बांधली असे होईल. कर्माचे वचन बदलून पाहू. विहीर ऐवजी विहिरी हे अनेकवचन घेतले तर राजाने विहिरी बांधल्या असे वाक्य होईल. म्हणजे क्रियापदाच्या रूपात बांधल्या असा बदल झाला.

याचाच अर्थ असा की, वरील वाक्यात कर्त्याऐवजी कर्माच्या लिंग वचनात बदल झाल्यास क्रियापदाचे रूप बदलते. म्हणून हा कर्मणि प्रयोग आहे. कर्मणि प्रयोगात क्रियापद कर्माच्या तंञाप्रमाणे चालते, म्हणजेच कर्म हा धातूरुपेश आहे.

कर्मणि प्रयोगाची लक्षणे

कर्मणिप्रयोगात कर्म प्रथमान्त असते, कर्ता प्रथमान्त कधीच नसतो. कर्ता केंव्हा तृतीयान्त, चतुर्थ्यन्त, सविकरणी तृतीयान्त किंवा शब्दयोगी अव्ययान्त असतो. उदा.

 1. त्यांनी कार्यक्रमात बक्षिसे वाटली.(कर्म त्यांनी हे तृतीयान्त.)
 2. तिने गाणे म्हटले. (कर्ता तिने हे तृतीयान्त. कर्म गाणे हे प्रथमान्त)
 3. सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी. (कर्ता सर्वांनी हे तृतीयान्त)
 4. मला हा डोंगर चढवतो. (कर्ता चतुर्थ्यन्त)
 5. रामाच्याने काम करवते. (कर्ता सविकरणी तृतीयान्त)
 6. मांजराकडून उंदीर मारला गेला. (कर्ता शब्दयोगी अव्ययान्त)

प्रधानकर्तृक कर्मणि प्रयोग – या प्रयोगात क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत असले तरी बहुतेक कर्ताच प्रधान असतो. त्यास  प्रधानकर्तृक कर्मणि प्रयोग असे म्हणतात. उदा.

 1. तिने गाणे म्हटले.
 2. मला हा डोंगर चढवतो.

शक्य कर्मणी प्रयोग – ज्या वाक्यात शक्यता सुचविली जाते, यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात व यातील क्रियापद हे शक्य क्रियापद असते. उदा. मधूच्याने अभ्यास करवितो.

 प्राचीन/पुरूष कर्मणी प्रयोग – प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून करिजे, बोलिजे, कीजे, दईजे अशी कर्मणी प्रयोगाची उदाहरणे आढळतात. उदा.

 1. त्वां काय कर्म करिजे लघु लेकराने.
 2. जो जे कीजे परमार्थ लाहो.
 3. नळें इंद्रासी असे बोलिजेले.
 4. द्विजी निषिधापासव म्हणीजेलो.

समापन कर्मणी – काही वेळा संयुक्त क्रियापदाने क्रियापदाच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला अअसे म्हणतात.सतो. अशा प्रकारच्या प्रयोगाला समापन कर्मणी असे म्हणतात. एखादी कृती करून पुर्ण झाली, हे दर्शविण्यासाठी सामान्यतः अशा प्रयोगाची रचना केलेली असते.

उदा. त्याचे पञ लिहून झाले.

या वाक्यात कर्ता त्याची षष्ठी विभक्तीत आहे. लिहून झाले या संयुक्त क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित झाला आहे.

नवीन कर्मणी/कर्म कर्तरी – 

 1. राम रावणास मारतो
 2. रावण रामाकडून मारला जातो.

इंग्रजी भाषेतील पॅसिव्ह व्हाॅईसच्या प्रभावामुळे मराठीतही आता अशी प्रकारची वाक्यरचना होऊ लागली आहे. यास कर्म-कर्तरी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग अशी नावे आहेत.

कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याचा प्रकार मराठीत रूढ झाला आहे, जेंव्हा वाक्यातील कर्माला प्राधान्य देऊन विधान करायचे असते, किंवा कर्त्याचा उल्लेख टाळायचा असतो त्यावेळी हा प्रयोग वापरला जातो. उदा.

 1. शिपायाकडून चोर पकडला गेला.
 2. न्यायाधीशाकडून दंड करण्यात आला.
 3. गाय गुराख्याकडून बांधली जाते.
 4. सभेत पञके वाटली गेली.
 5. सर्वांवर कारवाई केली जाईल.

३. भावे प्रयोग

क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरूषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असून ते स्वतंञ असते, तेंव्हा भावे प्रयोग तयार होतो. उदा. कंडक्टरने प्रवाशास विचारले.

या वाक्याच्या कर्त्याच्या व कर्माच्याही लिंगवचनात बदल केला तरीही क्रियापदाचे रूप मारले असेच राहते. भावे प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय असतो, त्याला प्राधान्य असते व त्यामानाने कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गाैण असतात.

 1. सर्वांनी मनसोक्त हसावे.
 2. मातेने मुलाला चालवावे.
 3. रामाने रावणास मारले.
 4. पावसाने सर्वांना झोडपले.
 5. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.
 6. त्यांनी आता शांत मरावे.
 7. त्याने आता घरी जावे.

या वाक्यांपैकी पहिली दोन सकर्मक आहेत व पुढील वाक्य अकर्मक आहे. भावे प्रयोगाचे सकर्मक भावे व अकर्मक भावे असे दोन प्रकार आहेत.

भावे प्रयोगाची लक्षणे

 1. अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विध्यर्थी असते.
 2. कर्म असल्यास त्याची सप्रत्ययी द्वितिया विभक्ती असते.
 3. शक्यार्थ क्रियापदांचा नेहमी भावे प्रयोग होतो.
 4. कर्ता तृतियान्त किंवा चतुर्थ्यन्त असतो.

भाव कर्तरी

 1. सहलीला जाताना काञजजवळ उजाडले.
 2. त्याला घरी जाण्यापूर्वी सांजावले.
 3. मला आज मळमळते.
 4. आज सारखे गडगडते.

वरील वाक्यांतील क्रियापदांना कर्ते असे नाहीत. सर्व वाक्यातील क्रियापदे तृतीयपुरूषी नपुंसकलिंगी एकवचनी आहेत. म्हणजे ती भावे प्रयोगी आहेत. पण त्यांना कर्ते नसल्यामुळे हा अकर्तृक भावे प्रयोग होय. अशा वाक्यात क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळे यास भावकर्तरी प्रयोग असेही म्हणतात.

मिश्र किंवा संकर प्रयोग

मराठीत प्रमुख तीन प्रयोग असले तरी, बोलताना आपण एकाच वाक्यात दोन वेगवेगळे प्रयोग वापरत असतो. त्यावरून मिश्र किंवा संकर प्रयोग बनलेले आहेत.

कर्तृ-कर्म संकर

 1. तू मला पुस्तक दिले. (कर्मणी प्रयोग)
 2. तू मला पुस्तक दिलेस. (कर्तरी व कर्मणी)

वरील वाक्यांतील पहिल्या वाक्यात निश्चितपणे कर्मणी प्रयोग आहे. दुसऱ्या वाक्यातील क्रियापद कर्ता व कर्म या दोघांच्याही लिंगवचनानुसार बदलते. दुसऱ्या वाक्यात कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगाच्या छटा आढळतात. म्हणून याला कर्तृ-कर्म संकर प्रयोग असेही म्हणतात. उदा.

 1. तू फुले दिलीस.
 2. तू कविता म्हटलीस.
 3. श्यामने गोष्ट सांगितली.
 4. तुम्ही कामे केलीत.
 5. तू लाडू खाल्लास.

कर्म-भाव संकर

कर्म-भाव संकर म्हणजे असा प्रयोग की ज्यात कर्ता व कर्म या दोघानांही प्रत्यय लागलेला असतो, म्हणून भावे प्रयोगाची छटा असते तर क्रियापद कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते म्हणून कर्मणी प्रयोगाची प्रचिती येते.  उदा. वडिलांनी मुलाला शाळेत घातले – वडिलांनी मुलाला शाळेत घातला.

कर्तृ-भाव संकर

या प्रकारामध्ये कर्माला प्रत्यय असतो व कर्त्यानुसार क्रियापद बदलते म्हणून येथे कर्तरी प्रयोग होतो आणि त्याचबरोबर कर्त्यालाही प्रत्यय लागतो म्हणून कर्ता-कर्म दोन्ही प्रत्ययसहित होतात व परिणामी भावे प्रयोग तयार होतो.  म्हणजेच भावे प्रयोगाची छटा यात आहे. म्हणून याला कर्म-भाव संकर प्रयोग म्हणतात.

 1. तू घरी जायचे होते. (भावे प्रयोग)
 2. तू घरी जायचे होतेस. (कर्तरी व भावे)

वरीलपैकी पहिल्या वाक्यात निर्विवादपणे भावे प्रयोग आहे. पण दुसऱ्या वाक्यात भावे प्रयोगाची व कर्तरी प्रयोगाचीही छटा आहे. म्हणून याला कर्तृ-भाव संकर प्रयोग असे म्हणतात.