प्रधानमंत्री श्रम पुरस्कार

प्रधानमंत्री श्रम पुरस्कार १९८५ पासून देण्यात येतात. सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रांत काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या योगदानाबद्दल हे पुरस्कार देण्यात येतात. आपली सेवा बजावताना विक्रमी कामगिरी करणाऱ्या, उत्पादनात विशेष योगदान देणाऱ्या, नवनिर्मितीचे कौशल्य असणाऱ्या, प्रसंगावधान व साहस दाखविणाऱ्या आणि बलिदान देणाऱ्या कामगारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

प्रधानमंत्री श्रम पुरस्कार- स्वरूप

श्रम पुरस्कारांची एकूण संख्या ३३ आहे

श्रम रत्न

एकूण पुरस्कार १ – रु. दोन लाख आणि त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल एक सनद.

श्रम भूषण

एकूण पुरस्कार-४- रु. 100000 आणि एक सनद

श्रम वीर/श्रम वीरांगना

एकूण पुरस्कार-१२- रु. 60000 आणि एक सनद

श्रम श्री/ श्रम देवी

एकूण पुरस्कार -१६-रु. 40000 आणि एक सनद

  • पुरस्कार विजेत्यांना रोख रकमेव्यतिरिक्त पंतप्रधानांच्या हस्ते सनद दिली जाते. तसेच पुरस्कार विजेत्यांना द्वितीय श्रेणीच्या रेल्वे तिकिटांवर ७५ टक्के सवलत मिळते.
  • श्रम रत्न हा पुरस्कार वगळता इतर पुरस्कार सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांना समान संख्येत दिले जातात.
  • या पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनी केली जाते व वितरण पंतप्रधानांच्या सोयीच्या वेळेनुसार केले जाते.

प्रधानमंत्री श्रम पुरस्कार 2016

  •  शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सेवेसाठी ‘प्रधानमंत्री श्रम पुरस्कार २०१६’ ची घोषणा करण्यात आली आहे.
  • श्रमरत्न, श्रमभूषण, श्रम वीर/वीरांगना आणि श्रमश्री/श्रमदेवी अशा चार श्रेणीत हे पुरस्कार देण्यात येतो.
  • देशभरातील ५० कामगारांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • सेल, भेल आणि टाटा स्टीलच्या एकूण १२ कामगारांना श्रमभूषण पुरस्कार जाहीर झाला.
  • यावर्षी श्रमरत्न पुरस्कारासाठी देशभरातून कुणाचीच निवड झालेली नाही.
  • याशिवाय १८ जणांना श्रमवीर/श्रमवीरांगणा पुरस्कार तर २० कामगारांना श्रमश्री/श्रमदेवी पुरस्कार जाहीर झाला आहे.