Contents
show
प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana-PMJJBY) ही शासनपुरस्कृत जीवन विमा योजना आहे. या योजनेची प्रथम घोषणा २०१५ च्या अर्थसंकल्पीय भाषणात अरुण जेटली यांनी केली होती.
सुरुवात
०९ मे २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे या योजनेची औपचारिक सुरुवात केली.
योजनेचे स्वरूप
या योजनेअंतर्गत १८–५० वयोगटातील विमाधारकाला २ लाख रुपयांचा जीवन विमा मिळतो. यासाठी ३३० रुपये प्रतिवर्ष एवढा प्रीमियम विमाधारकाच्या बँक खात्यातून वजा होतो.
विमा कालावधीत विमाधारकाचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास २ लाख रुपयांची रक्कम अदा केली जाते.
वैशिष्ट्ये
- वय: विमाधारकाचे वय १८-५० दरम्यान.
- विमाधारकाचे बँकेत खाते असणे आवश्यक.
- विम्याचा हप्ता विमाधारकाच्या खात्यातून आपोआप भरला जाणार.