प्रधानमंञी उज्वला योजना
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार अस्वच्छ इंधनाचा धूर श्वसनाव्दारे शरिरात जाणे, म्हणजे एका तासात ४०० सिगारेट पेटविण्याबरोबर आहे.
अशा इंधनाच्या ज्वलनातून होणार्या धुरामुळे प्रदूषण तर होतेच, त्याचबरोबर महिला व मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन त्यांना गंभीर असे श्वसनाचे आजार होतात.
प्रधानमंञी उज्वला योजननेचे उदिष्ट एलपीजी चे वितरण करून महिला व मुलांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे आहे.
ही योजना प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांनी १ मे २०१६ रोजी बलिया, उत्तर प्रदेश येथून सुरू केली.
या योजनेंतर्गत पुढील तीन वर्षात दारिद्र्य रेषेखालील ५ कोटी कुटुंबास एलपीजी कनेक्शन दिले जाईल. प्रत्येक कनेक्शनमागे १६०० रुपये मदत पुरविली जाईल.
या योजनेच्या माध्यमातून १ लाख रोजगार व १० हजार कोटींची व्यवसायर्निमिती होण्याची अपेक्षा असून मेक इन इंडिया या योजनेसही हातभार लागणार आहे.
एलपीजी कनेक्शन घरातील महिलेच्या नावे दिले जाते.