प्रत्येक सजीवामध्ये प्रजनन संस्था (Reproductive System) विकसित असते जेणेकरून तो स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करू शकेल. एका पिढीतून दुसऱ्या पिढीमधील जनुकीय तत्वांचे होणारे संक्रमण म्हणजे प्रजनन. विशिष्ट जातींची संख्या कायम राखण्यासाठी व ती प्रजाती नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी प्रजनन आवश्यक असते. प्रजनन मुख्यत्वे दोन प्रकारे होते.
१) अलैंगिक प्रजनन
- केवळ एका जनकाद्वारे होणारे प्रजनन.
- एकपेशीय सजीवामध्ये साधारणतः अलैंगिक प्रजनन होते.
- नवजात पेशी ही तंतोतंत मुळ पेशीसारखी असल्यामुळे या प्रकारच्या प्रजननामध्ये जीवाच्या जाती वैशिष्ट्याचा अभाव असतो.
- गुणसुञी विभाजन म्हणजे गुणसुञांची संख्या कायम राखून एक पेशी दुसऱ्या दोन पेशी तयार करते.
- विखंडन, बहुविखंडन, मुकुलायन, अनिषेकजनन, खंडीभवन, बीजाणूनिर्मिती, आणि शाकीय प्रजजन. किण्व, यकृतका, पानफुटी, वनस्पतीमधील शाकीय पुनरुत्पादन, अमीबा, पॅरामेशियम मधील द्विखंडीय विभाजन ही अलैंगिक प्रजननाची उदाहरणे आहेत.
एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार
बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार
२) लैंगिक प्रजनन
दोन जनक पेशींच्या संयोगाने नवीन पेशी तयार होण्याच्या क्रियेस लैंगिक प्रजनन म्हणतात. स्ञियुग्मक व पुंयुग्मक या जनक पेशी असून युग्मनज ही नवीन तयार झालेली पेशी असते. लैंगिक प्रजननामध्ये अर्धगुणसुञी विभाजन व फलन या दोन मुख्य क्रिया दिसून येतात.
अर्धगुणसुञी– गुणसुञांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकाची निर्मिती.
फलन– दोन अर्धगुणी युग्मकाच्या संयोगातून एका द्वगुणी युग्मनजाची निर्मिती.
मानवातील प्रजनन संस्था
अ) पुरूष – प्रजनन संस्था
वृषण व शिश्न हे पुरूष प्रजनन संस्थेचे मुख्य अवयव आहेत.
ब) स्ञी- प्रजनन संस्था
योनी, गर्भाशय, अंडवाहिनी व अंडाशय हे स्ञी प्रजनन संस्थेचे प्रमुख अवयव आहेत.
आनुवंशिकता (Heredity)
मानवी शरीरातील आनुवंशिक गुणधर्मांचे वहन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे करण्याचे महत्वपूर्ण कार्य गुणसूत्रांमार्फत पार पडले जाते. गुणसूत्रे केंद्रकाम्ले व प्रथिने यांच्यापासून बनलेली असतात.
गुणसूत्रांचे प्रकार
1. मध्यकेंद्री (Metacentric) – या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्यावर असतो व हे ‘V’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात गुणसूत्र भुजा समान लांबीच्या असतात.
2. उपमध्यकेंद्री (Sub-metacentric) – या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्याच्या जवळपास असतो व हे ‘L’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभूजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते.
3. अग्रकेंद्री (Acrocentric) – या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाजवळ असतो व हे ‘j’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असते.
4. अंत्यकेंद्री (Telocentric) – या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाला असतो व हे ‘i’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एकच गुणसूत्र भूजा असते.
डी.एन.ए. ( Deoxyribo Nuclic Acid )
- इ.स. 1869 साली श्वेत रक्तपेशींचा अभ्यास करताना स्वीस जीवरसायनशास्त्रज्ञ फ्रेड्रिक मिशर यांनी डी. एन. ए. चा शोध लावला.
- गुणसूत्रे मुख्यत: डी.एन.ए.ची बनलेली असतात.
- इ.स. 1953 साली वॅटसन व क्रिक यांनी डी. एन. ए. रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली.
- डी.एन.ए. रेणूतील प्रत्येक धागा न्युक्लीओटाइड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो.
- नायट्रोजनयुक्त पदार्थ ॲडेनीन, ग्वानीन, सायटोसीन व थायमीन अशा चार प्रकारचे असतात. त्यापैकी ॲडेनीन व ग्वानीन यांना प्युरिन्स म्हणतात तर सायटोसीन व थायमीन यांना पिरिमिडीन्स म्हणतात.
- डी.एन.ए. च्या रेणूमध्ये न्युक्लिओटाइडची रचना साखळीसारखी असते.
- या रचनेमध्ये प्रत्येक पायरी म्हणजे हायड्रोजन बंधाने जोडलेली नायट्रोजनयुक्त पदार्थांची जोडी होय. नेहमीच ॲडेनीनची थायमीन
बरोबर व ग्वानीनची सायोटोसीन बरोबर जोडी होते.
आर.एन.ए.( Ribo Nuclic Acid )
- आर.एन.ए. हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्युक्लीक आम्ल होय.
- हे आम्ल रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि ग्वानिन, सायटोसिन ॲडेनिन व युरॅसिल या चार नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेले असते.
- कार्यप्रणालीनुसारआर.एन.ए चे तीन प्रकार आहेत.
- रायबोझोमल आर.एन.ए. (r RNA) : रायबोझोम अंगकाचा घटक असलेला आर.एन.ए. चा रेणू होय. रायबोझोम प्रथिन संश्लेषणाचे काम करतात.
- मेसेंजर आर.एन.ए. ( mRNA ) : पेशीकेंद्रामध्ये असलेल्या जनुकांमधील अर्थात डी.एन.ए. च्या साखळीवरील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोमपर्यंत नेणारा ‘दूत रेणू’.
- ट्रान्सफर आर.एन.ए. (tRNA) : mRNA वरील संदेशानुसार अमिनो आम्लाच्या रेणूंना रायबोझोमपर्यंत आणणारा आर.एन.ए.चा रेणू.